नागपूर - आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेन सुरू झाले आहे. या दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध केला.
हेही वाचा - 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये चंद्रकांत पाटलांनीच केला भ्रष्टाचार'
महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या पहिल्या अधिवेशनाला आज सामोरे जात आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या माफीची मागणी काली आहे. यावेळी विधिमंडळाच्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि मित्र पक्षांनी 'मी पण सावरकर' लिहिलेल्या टोप्या घालून आंदोलन केले. यावेळी आंदोलक आमदारांनी शिवसेनेविरोधातही घोषणाबाजी केली.