ETV Bharat / state

मिशा कापल्याचा आरोप करणाऱ्या किरण ठाकूरचे केशकर्तन न करण्याचा नाभिक समाजाचा इशारा

मिशा कापल्याचा आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल करणाऱ्या किरण ठाकूर याची कोणीही दाढी आणि केस कापू नये, असे आवाहन नाभिक संघटना करणार आहेत.

शरद वाटकर
author img

By

Published : Jul 20, 2019, 11:46 PM IST

नागपूर- नाभिकाने न विचारता मिशा कापल्याचा आरोप करत किरण ठाकूर याने नाभिकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाने नवे वळण घेतले असून नाभिक संघटनेने किरण ठाकूरचे केशकर्तन करण्यावर बहिष्कार टाकण्याची तयारी केली आहे. कोणीही ठाकूर यांची दाढी आणि केस कापू नये, असे आवाहन संघटनेकडून केले जाणार आहे, त्यामुळे हे "मिशा' प्रकरण आणखीणच चिघळण्याची शक्यता आहे.

शरद वाटकर, जिल्हाध्यक्ष, नाभिक एकता मंच

मिशीवर वस्तरा फिरवल्यानंतर वाद घातल्याने आणि पाहून घेण्याची धमकी मिळाल्याने संतप्त झालेल्या किरण ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून सलून मालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राज्यभर या विषयाची चर्चा झाली. यामुळे नाभिक संघटना चांगल्याच भडकल्या आहेत.

किरण ठाकूर हे केवळ प्रसिद्धीसाठी मिशीवर "महाभारत' करीत असल्याचा आरोप नाभिक संघटनेने केला आहे. यापुर्वी अनेकदा ठाकूर यांनी दाढी-मिशा कापल्या आहेत. अनेक पोस्टरवर त्यांचे दाठी-मिशा नसलेले फोटो आहेत. त्यामुळे त्यांनी मिशा कापल्यावर त्याचा मोठा वाद करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ठाकूर यांनी जाणिवपूर्वक प्रसिद्धीसाठी हा वाद निर्माण केल्याचा आरोप करत, या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

Intro:न विचारता मिशी कापल्याने पोलीस स्टेशनमध्ये नाव्या विरोधात गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे... न्हाव्यानं न विचारता मिशा कापल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करणाऱ्या किरण ठाकूरच्या हजामतीवर नाभिक संघटनेनं बहिष्कार टाकण्याची तयारी केली आहे . कोणीही किरण यांची दाढी आणि केस कापू नये, असं आवाहन संघटने कडून केलं जाणार आहे,त्यामुळं या "मिशा' प्रकरण आणखीणच चिघळंलय. Body:मिशीवर वस्तरा फिरविल्यानंतर वाद घातल्यानं आणि पाहून घेण्याची धमकी मिळाल्यानं किरण यादव यांच्या तक्रारीवरून सलून मालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राज्यभर या विषयाची चर्चा झाली. यामुळं नाभिक संघटना चांगल्याच भडकल्या आहेत. किरण ठाकूर हे केवळ प्रसिद्धीसाठी मिशीवर "महाभारत' करीत असल्याचा आरोप नाभिक संघटनेनं केलाय. यापुर्वी अनेकदा ठाकूर यांनी दाढी-मिशा कापल्या आहेत. अनेक पोस्टरवर त्यांचे दाठी-मिशा नसलेले फोटो आहेत. त्यामुळं मिशा कापल्यावर त्याचा मोठा वाद करत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ठाकूर यांनी जाणिवपूर्वक प्रसिद्धीसाठी हा वाद निर्माण केल्याचा आरोप करत या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय.

- बाईट : शरद वाटकर, जिल्हाध्यक्ष, नाभिक एकता मंच
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.