ETV Bharat / state

Maharashtra Politics : बॅनरबाजीने रंगले नागपूरचे राजकारण, सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे कार्यकर्त्यांचे स्वप्न

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावाचे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले आहेत. सत्तासंघर्षात आपल्या नेत्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागेलच, अशी आशा आणि अपेक्षा नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे आता नागपुरात बॅनरबाजी सुरू झाली आहे.

Maharashtra Politics
बॅनरबाजीने रंगले नागपूरचे राजकारण
author img

By

Published : Apr 26, 2023, 3:59 PM IST

नागपूर : गेल्या वर्षभरापासूनच राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर आला आहे. त्यामुळे सत्तेच्या जवळ असलेले पुढारी मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल आणि सरकार अडचणीत येईल अशी शक्यता असल्याने विविध पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना आपले नेते मुख्यमंत्री होतील असे स्वप्न पडण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा आशयाचे बॅनर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरच्या बुटीबोरी येथे झळकले आहेत, तर आता फडणवीसांच्या बॅनरला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्साही नेत्यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावले आहेत.

बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भूमिकेकडे केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांचेच नाही तर कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी होतील असे कयास लावले जात असताना त्यांच्या समर्थनार्थ एका ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत. धक्कादायक म्हणजे ज्यांच्यासाठी हे बॅनर लावले आहेत, त्यात अजित पवार यांच्या फोटोला बॅनरवर स्थानचं देण्यात आलेले नाही. त्यामुळे उत्साही कार्यकर्त्यांनी स्वतःचे ब्रँडिंग करण्यासाठी बॅनरबाजी केल्याची लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. वचनाचा पक्का हुकुमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादा पक्का अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते प्रशांत पवार यांनी लावले आहेत.

देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्ते झाले सक्रिय : राज्याची उपराजधानी नागपूर शहर गेल्या दोन दशकांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. त्यामुळे संघाच्या मुशीत तयार झालेले नेते राज्य आणि केंद्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्ववाची छाप पाडत आहेत. मुख्यमंत्रीपद मिळता-मिळता देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे सत्तासंघर्ष झाल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे ते देखील बॅनरबाजी करत आहेत.

हेही वाचा : Sharad Pawar on Barsu refinery project : बारसू आंदोलकांना विश्वासात घेतले पाहिजे-शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.