नागपूर- बाळासाहेब ठाकरे १९६९ साली पहिल्यांदा नागपूरला येणार होते. त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाने बाळासाहेब जिवंत परत जाणार नाहीत, अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब नागपूरला आले असताना त्यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. बाळासाहेबांनी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा हल्ला कसा परतवून लावला, या संदर्भात संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. याचा आनंद असल्याचे प्रतिपादन संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी व्यक्त केला आहे. दिलीप देवधर यांच्या प्रयत्नांमुळेच जानेवारी १९६९ मध्ये शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे पहिल्यांदा नागपुरात आले होते. नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या कार्यक्रमासाठी बाळासाहेब १९६९ मध्ये नागपुरात आले होते. तेव्हा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा कम्युनिस्ट पक्षाचा डाव होता. तसेच बाळासाहेबांवर त्यावेळी नागपूर विमानतळावर हल्लाही झाला होता. परंतु, बाळासाहेब ठाकरे या सर्वातून सुखरूप बाहेर पडले होते. आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असताना नागपूर व बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना दिलीप देवधर यांनी उजाळा दिला आहे. याबाबत त्यांच्याशी चर्चा केली 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी.
हेही वाचा- नागपूर: हुतात्मा जवान राकेश सोनटक्के यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार