नागपूर मारबत उत्सव म्हंटले तर बडग्यांची badgya चर्चा तर ही होणारच. कारण मारबत उत्सवातील सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधक घटक म्हणून या बडग्यांकडे बघितले जाते. काळी पिवळी मारबतींच्या marbat मागे पुढे असणारे पुतळे म्हणजे बडगे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवर भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींतून बडग्यांच्या माध्यमाने जनतेच्या मनातल्या प्रश्नासह विरोधाचा राग आणि संताप व्यक्त केला Opposing Traditions Through Budgies जातो. यावर्षी कोणत्या विषयांवर बडगे निघतील याकडे संपूर्ण नागपुरकरांचे विशेष लक्ष लागलेले आहे.
बडगे मिरवणुकीत सहभागी वर्षभर घडणाऱ्या विविध घटना आणि विषयांवर आधारित भाष्य करणारे बडगे मिरवणुकीत Badgya Procession सहभागी केले जातात. त्याचबरोबर अनिष्ट रूढीपरंपरांवर देखील बडग्यांच्या माध्यमातून प्रहार केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावामुळे बडग्या मारबत उत्सव साजरा करण्यावर निर्बंध होते. त्यामुळे या वर्षी बडगे तयार करण्यासाठी अनेक विषयांची उपलब्धता झाली आहे.
बडग्या म्हणजे काय बडग्या म्हणजे काय हा प्रश्न तर पडणे स्वाभाविक आहे. तर त्याची माहिती अशी आहे की भोसले राजघराण्यातील बाकाबाई ने इंग्रजांसोबत हात मिकवणी केली म्ह्णून तिच्या कृत्याचा निषेध म्हणून काळी मारबत काढली जाते. बाकबाईच्या या कृत्याची माहीती असताना देखील तिच्या नवऱ्याने तिच्या कृत्याला विरोध केला नाही म्हणून त्याचाही पुतळा काढला जातो,त्याला बडग्या असे म्हंटले जाते. गेल्या १४२ वर्षांपासून काळ्या मारबती सोबतचं बडग्यांच्या देखील मिरवणूक काढली जाते. यामध्ये वर्षभरात घडलेल्या विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि इतर विषयांना अनुसरून भाष्य करणारे स्लोगन बडग्यांवर लिहून त्यांची मिरवणूक काढली जाते.
या विषयांवर बडगे निघण्याची शक्यता या वर्षात राज्याच्या राजकारणात उलथापालथीच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्याला अनुसरून यावर्षी राजकीय विषय असलेले बडगे काढले जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील सर्व कसं ओके मध्ये आहे' यावर सुद्धा बडगे काढले जाऊ शकतात. त्याच बरोबर गोवाहटी मध्ये रंगलेलं सत्ता नाट्य,महागाई, रशिया युक्रेन युद्ध, कोरोना, स्वाईन फ्लू, अंधश्रद्धा, अग्नीवर, प्लास्टिक पिशव्या बंदी,अतिवृष्टी यासह अनेक विषयांवर बडगे निघण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.