नागपूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये आज शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली. यात सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा- एल्गार परिषदेच्या प्रकरणाची 'एसआयटी' तर्फे चौकशी व्हावी; शरद पवारांची मागणी
मागील सरकारने ऑनलाइन अर्जाच्या नावावर शेतकऱ्यांना त्याच्या पत्नीसह रांगेत उभे करून शेतकऱ्यांचा अपमान केला होता, अशी टीका बच्चू कडू यांनी भाजपवर केली. कर्जमाफीच्या योजनेत स्पष्टता आल्यानंतर त्याची व्याप्ती पुढे येईल. त्यात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय नसल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करायला देखील मागे हटणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.