नागपूर - अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुर येथील मुख्यालयासमोर भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरएसएस कडून राम मंदिराचा आग्रह केला जातो आहे. सर्वात जुनी मागणी आज पूर्ण होत असल्याचा सर्वाधिक आनंद राम भक्तांसोबतच स्वयंसेवकांना होतो आहे. त्याकरिता आज महाल परिसरातील मुख्यालयासमोर रांगोळी काढण्यात आली आहे .
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आज अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अयोध्येत सुरू असलेल्या उत्सवात थेट सहभागी होता येत नसल्याने नागपूरात राम भक्तांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. राममंदिराच्या भूमि पूजन कार्यक्रमाबाबत पंतप्रधान मोदींचा मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम जाहीर झाला आहे. मोदी आज सकाळीसकाळी ९ वाजून 30 मिनिटांनी दिल्लीहून अयोध्येसाठी प्रवास सुरू करतील. तर कार्यक्रम संपल्यानंतर 2 वाजून 20 मिनिटांनी मोदी लखनऊसाठी हेलीकॉप्टरने अयोध्याहून निघतील.