ETV Bharat / state

नागपुरात पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न; सुदैवाने दुर्घटना टळली

ड्युटी पूर्ण करून घरी निघालेल्या पॅरा-मेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर (इंटर्न) एका माथेफिरूने बंदूक रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने बंदुकीतून गोळी फायर न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरातील अधिष्ठाता कार्यालय परिसरात ही घटना घडली. (government medical college nagpur) आरोपीचे नाव विक्की चाकोले, असे आहे.

Attempt to shoot on para-medical student (intern) in nagpur
नागपुरात पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Nov 22, 2021, 9:48 PM IST

Updated : Nov 22, 2021, 10:52 PM IST

नागपूर - ड्युटी पूर्ण करून घरी निघालेल्या पॅरा-मेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर (इंटर्न) एका माथेफिरूने बंदूक रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने बंदुकीतून गोळी फायर न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरातील अधिष्ठाता कार्यालय परिसरात ही घटना घडली. (government medical college nagpur) आरोपीचे नाव विक्की चाकोले, असे आहे. घटनेनंतर आरोपी पळून गेला असून त्याला अटक करण्यासाठी अजनी पोलीस ठाण्याचे (ajani police station) आणि गुन्हे शाखेचे तीन पथक (nagpur crime branch) रवाना करण्यात आले आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत याबाबत माहिती देताना. तसेच विद्यार्थ्याच्याही प्रतिक्रिया.

पीडित तरुणी ही वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. शिक्षणासाठी ती नागपूरला राहते. तर आरोपी विक्की चकोले हा नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील रहिवासी आहे. आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाली असताना आरोपी हा पार्किंगमध्ये तिची वाट बघत होता. ती गाडी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेली असता आरोपीने तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापले विक्कीने तिच्यावर बंदूक रोखली. आरोपीने दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी बंदुकीत लॉक झाल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचवेळी मेडिकल मध्ये तैनात असलेले कर्मचारी तेथील जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी धाव घेतली तोपर्यंत आरोपी विक्की घटनास्थळावरून फरार झाला होता.

पोलीस घटनास्थळी दाखल -

घटनेची माहिती मिळताच, अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. घटना गंभीर असल्याने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. आरोपी पळून गेल्याने त्याला शोधण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आले आहेत.

यवतमाळच्या घटनेची पुनरावृत्ती टळली -

काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथे एका डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुदैवाने आरोपीने आणलेल्या बंदुकीतून गोळी अडकून पडल्याने यवतमाळच्या घटनेची पुनरावृत्ती टळली.

Last Updated : Nov 22, 2021, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.