ETV Bharat / state

थराराक..! नागपुरात गजबजलेल्या चौकात तरुणावर गोळीबार

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, इमरान सिद्दीकी हा त्याच्या काही मित्रांसोबत उभा होता. दरम्यान दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेत इम्रानला दोन गोळ्या लागल्या, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

Imran Siddique attacked
नागपूर गोळीबार
author img

By

Published : Mar 7, 2020, 9:26 PM IST

नागपूर- नागपूर-उमरेड मार्गावरील दिघोरी पुलाजवळ गजबजलेल्या चौकात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या काही हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार केला. यात तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. इम्रान सिद्दिकी, असे जखमी तरुणाचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, इमरान सिद्दिकी हा त्याच्या काही मित्रांसोबत उभा होता. दरम्यान, दुचाकीवर आलेल्या काही हल्लेखोरांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेत इम्रानला दोन गोळ्या लागल्या, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून बुलेटचे शेल जप्त केले आहे. प्राथमिकदृष्ट्या ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला असून तपासाला सुरवात केली आहे.

हेही वाचा- या अर्थसंकल्पातही आमची मागणी अपूर्णच.. श्रीपाद जोशींनी व्यक्त केली नाराजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.