नागपूर - पूर्व विदर्भात मागील काही दिवसांची सरासरी पाहता रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली. सरासरी 1 हजार 400 वर असणारी रुग्ण संख्या घटून 1 हजार 258वर आली. नागपूर जिल्ह्यात रविवारी 899 नवे कोरोनाबाधित आठळले तर ११ जणांचा मृत्यू झाला.
नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. महिन्याच्या सुरुवातीला दररोज सरासरी 300 ते 350 रुग्ण होते. यात हळूहळू वाढ होऊन हा आकडा प्रतीदिन 1 हजार 200 ते 1 हजार 400पर्यंत पोहचली. आतापर्यंत जिल्ह्यात 4 हजार 335 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 772 जण ग्रामीण भागातील आहेत तर, 2 हजार 802 रुग्ण शहरातील आहेत.
जिल्ह्यात 8 हजार 253 रुग्ण -
सध्या नागपूर जिल्ह्यात 8 हजार 253 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 6 हजार 901 रुग्ण शहरातील आहेत तर, 1 हजार 352 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे दोन दिवस शहरात कर्फ्यू लावण्यात आला होता.
पूर्व विदर्भात 1 हजार 258 नवे कोरोनाबाधित -
पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यात 899, वर्धा 222, चंद्रपूर 70, गडचिरोली 34, भंडारा 22 तर गोंदियामध्ये 11 असे एकूण 1 हजार 258 नवीन रुग्ण महिन्याच्या शेवटच्या दिवशी सापडले. तर, 701 जण बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली.