नागपूर - आसामचे मुख्यमंत्री हेमंत विस्वा शर्मा शुक्रवारी नागपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यलयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री व सरसंघचालकात एक तास बंद दाराआड चर्चा
आसाममध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदाची माळ हेमंत विस्वा शर्मा यांच्या गळ्यात पडली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर हेमंत विस्वा शर्मा यांनी प्रथमच संघ मुख्यलयातमध्ये भेट दिली आहे. मुख्यमंत्री हेमंत विस्वा शर्मा आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात एक तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. मात्र नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली या बद्दल माहिती कळू शकलेली नाही.
हेही वाचा - पाच महत्त्वाच्या भेटीतून समजून घ्या महाराष्ट्राचे राजकीय गणित