नागपूर - पत्रकारितेच्या क्षेत्रात समाज जागृती आणि सामाजिक जीवनस्थर उंचावण्यासाठी कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना गेल्या १७ वर्षांपासून विदर्भ स्थरावरील अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्काराचे महाराष्ट्र स्थरावर वितरण करण्यात आले. नागपुरातील वनामती सभागृहात हा सोहळा पार पडला.
ज्येष्ठ पत्रकार अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्या उपस्थित ९ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रा. सुरेश द्वादशीवार यांना जीवनगौरव पुरस्कार व अन्य ८ पत्रकारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात विजय बाविस्कर (मुद्रित माध्यम), डॉ. उदय निरगुडकर (इलेक्ट्रॉनिक माध्यम), विजय गायकवाड (कृषी) व दीपा कदम (उत्कृष्ट महिला पत्रकारिता) यांचा समावेश आहे. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार, अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजीत देशमुख, कार्याध्यक्ष डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते.