ETV Bharat / state

Scam in SSC Exam : डमी उमेदवारांचे बिंग फुटले! सीबीआयकडून नागपूर आयकर विभागाच्या 9 अधिकाऱ्यांना अटक - CBI arrested 9 officials in Nagpur

परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने नागपुरात मोठी कारवाई ( CBI arrested 9 officials in Nagpur ) केली आहे. आयकर विभागाच्या ९ अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक (CBI Arrest Nagpur IT Officers) केली आहे. वर्षानुवर्षे यातील काही अधिकाऱ्यांना पदोन्नतीही मिळाली होती, असे एका अधिकाऱ्याने (Nagpur IT News) सांगितले.

सीबीआय
सीबीआय
author img

By

Published : Dec 14, 2022, 7:12 AM IST

Updated : Dec 16, 2022, 10:36 AM IST

नागपूर : सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने ( Anti corruption wing of CBI ) नागपूर आयकर विभागाच्या 9 अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर आरोप आहे की 2012-14 मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ( dummy candidates in the Staff Selection Commission ) परीक्षेत डमी उमेदवारांना बसवले होते. सीबीआयने याप्रकरणी 2018 मध्ये गुन्हा दाखल केला आला होता. तब्बल चार वर्षे तपास केल्यानंतर आरोपींविरोधात भक्कम पुरावे सापडल्यानंतर मंगळवारी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण - अटक करण्यात आलेल्यामध्ये रिंकी यादव, स्टेनोग्राफर (ग्रेड-II), सरिता, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार, मनीष कुमार आणि धर्मेंद्र कुमार यांचा समावेश ( 9 officials of Nagpur Income Tax Department ) आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने 6 मार्च 2018 रोजी गुन्हा दाखल केला होता. आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम १३ (२) आर/डब्ल्यू १३ (१) (ड) अन्वये कारवाई करण्यात ( CBI arrested 9 officials of Nagpur ) आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने 2012-14 मध्ये घेतलेल्या भरती परीक्षेत हे अधिकारी बसले नाहीत. तर परीक्षेला बसण्यासाठी डमी उमेदवारांची व्यवस्था केली आणि कर्मचारी निवड आयोगाची दिशाभूल केली. वर्षानुवर्षे यातील काही अधिकाऱ्यांना पदोन्नतीही मिळाली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले

.

डमी उमेदवारांनी दिली होती परीक्षा - 2018 मध्ये, नागपुरातील सीबीआय एसीबीने भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता आणि 12 आय-टी कर्मचारी स्टेनोग्राफर म्हणून आणि मल्टी-टास्किंग स्टाफच्या पदांवर रुजू झाल्याचा आरोप समोर आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, या उमेदवारांचे हस्ताक्षर, स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे असलेले परीक्षेचे पेपर आणि इतर कागदपत्रे फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आली होती. फॉरेन्सिक विश्लेषणाने हे सिद्ध केले की या १२ पैकी नऊ उमेदवार या चाचणीसाठी प्रत्यक्षात उपस्थित नव्हते. त्याऐवजी डमी उमेदवारांनी त्यांच्या वतीने भरती परीक्षा लिहिली, असा दावा सीबीआयने केला आहे.

16 डिसेंबरपर्यंत कोठडी - केंद्रीय तपास संस्थेने आयटी विभागाच्या या कर्मचाऱ्यांना अटक केली आणि त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले. त्यांना 16 डिसेंबरपर्यंत कोठडी मिळाली. ही संपूर्ण कारवाई उपमहानिरीक्षक (सीबीआय- नागपूर) सलीम खान यांच्या देखरेखीखाली पार पडली.

Last Updated : Dec 16, 2022, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.