ETV Bharat / state

नागपूर पदवीधर निवडणूक : सर्व मतदान केंद्रावर असेल सीसीटीव्हीद्वारे नजर - नागपूर पदवीधर निवडणूकीवर सीसीटीव्हीची नजर बातमी

नागपूर जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगकडून नागपूर जिल्ह्यातील १६४ मतदान केंद्रावर सीसीटिव्हीव्दारे नजर ठेवण्यात येणार आहे.

all-polling-stations-will-be-monitored-by-cctv-in-nagpur
नागपूर पदवीधर निवडणूक : सर्व मतदान केंद्रावर असेल सीसीटीव्हीव्दारे नजर
author img

By

Published : Nov 30, 2020, 9:23 PM IST

नागपूर - पदवीधर मतदान प्रक्रिये दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. शिवाय मतदान प्रक्रिया सुस्पष्ट व्हावी, यासाठी नागपूर जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगकडून नागपूर जिल्ह्यातील १६४ मतदान केंद्रावर सीसीटिव्हीव्दारे नजर ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील आढावा जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. शिवाय ही निवडणूक सर्वच अंगाने महत्त्वपूर्ण असल्याने आणि निवडणूक आयोगाला मदत व्हावी, म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदात्यावर आता सीसीटीव्हीची नजर -

पदवीधर निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेला काही तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर ही मतदान प्रक्रिया सुस्पष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विविध खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणूकीत सर्व खबरदारी बरोबरच मतदान प्रक्रियेतील सुस्पष्टतेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्यामुळे अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. शिवाय इतर निवडणूकींपेक्षा या निवडणूकीत मोजकीच मतदान केंद्र असल्याने ही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानासाठी जाणाऱ्या प्रत्येक मतदात्यावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. या सर्व केंद्रातील आढावा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. तसेच मतदान केंद्रावरिल अधिकाऱ्यांनाही यावेळी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. एकंदरीतच पदवीधर निवडणूकीत कोरोना विषयक खबरदारी बरोबरच सीसीटीव्ही सारख्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रशासनाकडून अवलंबण्यात येत असल्याचे पहायला मिळत आहे. शिवाय मतदान प्रक्रिया सुलभ व सरळ करण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - नागपुरात कार चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर नेले फरफटत; घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.