ETV Bharat / state

मांजामुळे कुणालाही इजा होऊ नये म्हणून शहरातील सर्व उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद - nagpur traffic pools closed

वाहतुकदारांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी नागपूर शहरातील सर्व प्रकारचे लहान-मोठे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षातील इतिहास लक्षात घेता दरवर्षी शहरातील उड्डाणपूल बंद ठेवले जातात.

सर्व उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद
सर्व उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद
author img

By

Published : Jan 14, 2021, 4:14 PM IST

नागपूर - मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजी करताना वाहतुकदारांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी नागपूर शहरातील सर्व प्रकारचे लहान-मोठे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षातील इतिहास लक्षात घेता दरवर्षी शहरातील उड्डाणपूल बंद ठेवले जातात. यावर्षी या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना पोलीस दिसून येत आहेत. प्रत्येक पुलाच्या दोन्ही टोकाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
उपराजधानी नागपुरात अनेक मोठे उड्डाणपुल आहेत. ज्यामध्ये चार किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाचा समावेश आहे. यावरून दरदिवशी हजारो वाहन ये-जा करतात. आज मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी असते. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकांच्या गळयात मांजा अडकून एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक भागातील उड्डाणपूल संपूर्ण दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

शहरातील सर्व उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये
पतंग कापली गेल्यानंतर नायलॉन मांजा रस्त्यांवर पडल्यामुळे उपराजधानी नागपुरात अनेकांचा जीव गेलेला आहे. यावर्षी सुद्धा तीन घटना घडल्या आहेत. यात दोन चिमुकल्यांचा बळी गेला आहे. इतिहासात डोकावून बघितले तर दर वर्षी दोन ते तीन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी शहरातील पुलांवरील वाहतूक बंद ठेवली जाते.

हेही वाचा - "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून लवकर निर्णय घेणार"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.