नागपूर - निर्जिव मूर्तीपेक्षा जीवंत माणसे महत्वाची आहेत. त्यामुळे, वाडिया रुग्णालयातील मुलांच्या उपचारासाठी पैसे देण्यात यावे, अशी मागणी केल्याचा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मूर्तीपेक्षा जीवंत माणसांची किंमत करण्याची शिकवण दिली असल्याचे ते म्हणाले आहेत.
इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. तिथे पुतळा उभा करण्यापेक्षा तो पैसा वाडिया रुग्णालयासाठी देण्यात यावा, अशी भूमिका घेतल्यामुळे माझा विरोध होतो आहे. त्याची मी कधीही पर्वा केली नाही. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी आहे. निर्जिव मूर्तीपेक्षा जीवंत माणसे महत्वाची आहेत. ती जगली तर देशाचे भविष्य घडणार आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
हेही वाचा- देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केली तुफान फटकेबाजी