नागपूर - मागील 10 वर्षांपासून खंड न पडू देता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी प्रेरणा घेऊन मातृभूमी सेवा प्रतिष्ठानकडून 14 ऑगस्ट हा अखंड भारत संकल्प दिवस म्हणून साजरा करतात. शहरातील सक्करदारा चौकात कोरोनाच्या निर्बंधामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थित सामूहिक वंदे मातरमचे गायन करुन साजरा करण्यात आला. यावेळी अखंड भारत संकल्प दिवस साजरा करण्यात आला.
मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मागील दहा वर्षात मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभल्याने या कार्यक्रमाचे स्वरूप मोठे झाले. यात कोरोनाच्या निर्बंधापासून मागील वर्षी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला होता. यंदाही कोरोनामुळे कमी लोकात समूहिक वंदे मातरम गायन करत अखंड भारत होण्याचा संकल्प घेण्यात आला. यासोबत जोपर्यंत अखंड भारताचे स्वपं पूर्ण होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम असाच सुरू राहिल, अशी भूमिका आयोजक डॉ. रवींद्र भोयर यांनी मांडली.
हेही वाचा - मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अनुदानात 3700 कोटींचा घोटाळा?; नागपूर खंडपीठात याचिका दाखल
काश्मिरमध्ये ज्या पद्धतीने केंद्र सरकारचे काम सुरू आहे, जे वातावरण निर्माण झाले आहे ते याच अखंड भारत संकल्पनेचा भाग आहे. यामुळे आझाद काश्मिर भारतात कधीही विलीन होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात लवकरच अखंड भारत म्हणून गणल्या जाईल आणि उदयास येईल. पुन्हा 14 ऑगस्ट 1947 रोजी असलेला भारत निर्माण होईल, अशी प्रतिक्रियाही मातृभूमी प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र भोयर यांनी दिली.