ETV Bharat / state

Honey Trap Case : हवाई दलातील अधिकारी निखिल शेंडे यांचा हनी ट्रॅप प्रकरणाशी काहीही संबंध नाही - लीला शेंडे

हनी ट्रॅप प्रकरणाशी नागपूरचाही संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. निखिल शेंडे हा मूळचा नागपूरचा असून तो हवाई दलातील अधिकारी आहे. निखिल शेंडे याच्या मोबाईल क्रमांकावरून प्रदीप कुरुलकर यांना मेसेज आला आहे. याप्रकरणी एटीएसने तपास सुरू केला आहे. मात्र, निखिल शेंडेंच्या आई लीला शेंडेंनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Honey Trap Case
Honey Trap Case
author img

By

Published : May 18, 2023, 3:58 PM IST

निखिल शेंडेंच्या आई लीला शेंडेंची प्रतिक्रिया

नागपूर : पुण्यातील डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. आता या हनी ट्रॅप प्रकरणात मूळचा नागपूरचा रहिवासी असलेल्या निखिल शिंदेचे नाव समोर आले आहे. निखिल शिंदे हवाई दलात कार्यरत आहे. हनी ट्रॅपमध्ये निखिलचे नाव समोर आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. दरम्यान निखिलच्या आईने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणातील चौकशीत निखिलची चौकशी झाली असता त्याला क्लीन चिट मिळाल्याने तो ड्युटीवर रुजू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

निखिलची तात्काळ सुटका : निखिल मुरलीधर शेंडे हा मूळचा नागपूरचा आहे. त्याचे घर शांतीनगर परिसरात असून तेथे त्याची आई, मामाचे कुटुंब राहते. निखिलच्या वडिलांचे निधन झाले आहे. निखिलची क्रीडा कोट्यातून हवाई दलात नियुक्ती झाली आहे. मैदान हेच आपले विश्व असल्याची भावना निखिलच्या आईने व्यक्त केली आहे. ही बातमी वाचून त्यांना धक्काच बसल्याचे निखिलच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. या प्रकरणी निखिलला चौकशीसाठी पुण्याला नेण्यात आले. तपास अधिकाऱ्यांना तपासात काहीही चुकीचे आढळले नाही, त्यामुळे त्यांनी निखिलची तात्काळ सुटका केली, असे त्याच्या आईने सांगितले.

निखिलच्या नंबरवरून कुरुलकर यांना मेसेज : हनी ट्रॅप प्रकरणाचा तपास सुरू असतानाच निखिल शेंडेचे नाव पुढे आले होते. निखिल सध्या बंगळुरू येथे हवाई दलात कार्यरत आहे. कुरुलकर यांना निखिल शेंडे यांच्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला होता.

तो मोबाईल नंबर निखिलच्या काकांचा : निखिल शिंदेने वापरलेला मोबाईल नंबर ज्यावरून प्रदीप कुरुलकर यांना मेसेज गेले होते, त्या नंबरची नोंदणी निखिलच्या काकांच्या नावावर आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तो हा नंबर वापरत होता.

हनीट्रॅप प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न : कुरुळकर यांच्याप्रमाणेच दलातील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने हनीट्रॅप प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. शेंडे बेंगळुरू येथे सध्या कार्यरत आहेत. त्याची हवाई दलाकडून चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकणाला वेगळे वळण लागले होते. मात्र, निखिल शेंडेंच्या आईने सर्व आरोप फेटाळुन लावले आहेत.

  • हेही वाचा -
  1. International Museum Day 2023 : जयपूरच्या संग्रहालयात आहे जगातील सर्वात मोठा ज्वेलरींचा खजिना, जाणून घ्या काय आहे खासियत
  2. Sameer Wankhede Bribery Case : दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडेंना दिलासा; पाच दिवस अटकेपासून संरक्षण
  3. Siddaramaiah Elected As New CM : कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला; अखेर सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.