ETV Bharat / state

माझी मेट्रो नागपूर : 'मला श्रेय नको तर, जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे' - nagpur metro aqualine

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे. गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुप्रतिक्षित नागपूर मेट्रोच्या अ‌ॅक्वा लाईनचे उदघाटन होणार होते. मात्र, त्यावेळी सलग ४ दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

nagpur metro
नागपूर मेट्रो
author img

By

Published : Jan 28, 2020, 10:45 AM IST

Updated : Jan 28, 2020, 1:43 PM IST

नागपूर - मला श्रेय नको तर जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. बहुप्रतिक्षित नागपूर माझी मेट्रोच्या अ‌ॅक्वा लाईनचे आज (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबई-पुणे महामार्ग हा बाळासाहेबांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. हा प्रकल्प कसा होणार असा प्रश्न होता. मात्र, त्यावेळी गडकरींनी विश्वास दाखवला आणि प्रकल्प पुर्ण केला. वेळेच्या आत प्रकल्प गडकरींनी पूर्ण केला. तसेच एका गाडीत नाही मात्र, एका स्टेशनवर आपण एकत्र आलो आहोत. असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले. आपण मुख्यमंत्री असताना पुढाकार घेतला विकास कामाना प्राधान्य दिले आहे. मला श्रेय लाटायचे नाही तर मला सर्वांना श्रेय द्यायचे आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

मला श्रेय नको तर जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे, असेही ते म्हणाले. विकास कामात कधीही विरोध करणार नाही. ते थांबवणार तर विकासाचा वेग कायम ठेवणार. तसेच उपराजधानी कधी मागे पडू देणार नाही. मुंबई, नागपूरसह इतर शहरांचा विकास साधणार, असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रत्येक शहराची ओळख असते. एक चेहरा असतो तो कायम ठेवला पाहिजे. यासोबत पर्यावरणाचाही विचार झालाच पाहीजे, असे ते म्हणाले. तर आता नागपूर मेट्रोची जबाबदारी आता नागपूरकरांची आहे. परदेशी पाहुणे ही मेट्रो पहायला यायला पाहीजे, असे ते म्हणाले.

केंद्राकडे काही प्रकल्प अडकलेले आहेत. त्या प्रकल्पांना तातडीने परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केंद्र सरकारला केली. दोन्ही सरकारांनी हातात हात घालून काम केले तर अडचण येणार नाही, असेही ते म्हणाले. एकत्रित काम करून अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नागपूरला येऊन एकदा तरी मेट्रोमधून नक्की प्रवास करणार, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितीन राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उद्घाटन सोहळ्याच्या बाहेर गोंधळ सुरु झाला. 'जय जवान, जय किसान' संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे झळकावत विरोध प्रदर्शन केले आहे. या आंदोलनानंतर सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंमत असेल तर भाजपने सरकार बरखास्त करून दाखवावे, असे आवाहन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. तसेच ही सरकार मोदी-शहा यांच्या विरोधात आलेले असल्याचेही ते म्हणाले. जनता हे केंद्र सरकारच्या कुटील बळी पडणार नाही तर त्याला विरोध करेल. कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करत आहे, असेही ते म्हणाले. तर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर कोणीही नाराज नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होत आहे. गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुप्रतिक्षित नागपूर मेट्रोच्या अ‌ॅक्वा लाईनचे उदघाटन होणार होते. मात्र, त्यावेळी सलग ४ दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तेव्हापासून सलग ४ महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या माझी मेट्रोच्या अ‌ॅक्वा लाईनच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर सापडला आहे.

माझी मेट्रो नागपूर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या अ‌ॅक्वा लाईन मार्गाचे होणार उद्घाटन

Intro:Body:

[1/28, 10:18 AM] Dhananjay tiple Nagpur: नागपुर फ्लॅश

नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कार्यभार सांभाळला

सकाळी 9.30 मिनिटांनी महापालिकेच्या मुख्यालयात कार्यभार सांभाळला

पहिल्याच दिवशी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

हजेरीसाठी वापरात येणाऱ्या पंचिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ

[1/28, 10:22 AM] Dhananjay tiple Nagpur: नागपूर

माझी मेट्रोच्या ऍक्वा लाईनच्या उदघाटन सोहळ्याच्या बाहेर गोंधळ

जया जवान जय किसान संघटनेच्या कार्यकर्त्याचे काळे झेंडे झळकावत विरोध प्रदर्शन

सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Conclusion:
Last Updated : Jan 28, 2020, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.