नागपूर - जिल्ह्यातील बोरखेडी येथील बोथली परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मितीच काम लॉकडाउनच्या काळात बंद झाल आहे. हे निर्माण कार्य फक्त राजकीय हेतूमुळे बंद झाल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी हे केंद्र निर्मितीचे कार्य पूर्ववत सुरू करण्याची मागणीसाठी आमदार समीर मेघे यांनी केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मितीचे कार्य पूर्ववत सुरू करण्याच्या करण्यात यावे या करता समीर मेघे प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून या प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.
आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यात आली होती. त्यावेळी रखडलेल्या आरोग्य केंद्राचे निर्माण कार्य पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती. मागणी मान्य न झाल्यास आमदार मेघे यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्यानुसार समीर मेघे यांनी समर्थकांसह जिल्हा परिषदे समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हे आंदोलन करत आपल्या मागणी कडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात बोथली येथील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. बोथली येथे आरोग्य केंद्र सुरू केल्याचे श्रेय मला मिळू नये या करिता हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप मेघे यांनी केला आहे. सध्या कोरोनामुळे या परिसरातील लोकांना आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने बोथली येथे तात्काळ आरोग्य केंद्र सुरू करण्याची गरज आहे, त्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आमदार समीर मेघे यांनी राजकिय नफा तोटा विसरून जनतेची मागणी पूर्ण करावी अशी मागणी केली आहे.
काम सुरू केल्यास बिल मंजूर होणार नाही; ठेकेदाराला मिळताहेत धमक्या -
राजकीय स्वार्थासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम बंद करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य हे अधिकाऱ्यांन द्वारे ठेकेदाराला काम बंद करण्याची धमकी देत असल्याचा आरोप समीर मेघे यांनी केला आहे. काम सुरू केल्यास १४ लाखांचे बिल मंजूर होणार नसल्याची धमकी ठेकेदाराला मिळत असल्याचे ते म्हणाले.