ETV Bharat / state

पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी - graduate elections preperations last stage

सगळ्यांचे लक्ष लागलेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. या निवडणूकीसाठी उमेदवारांबरोबरच प्रशासनासह सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीकरिता प्रशासन म्हणून केल्या जाणारी तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबतची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

elections
पदवीधर निवडणूक
author img

By

Published : Nov 18, 2020, 9:46 PM IST

Updated : Nov 18, 2020, 10:19 PM IST

नागपूर - १ डिसेंबर रोजी होवू घातलेल्या शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची तयारी प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आहे. कोरोना बाबत विशेष खबरदारी घेत ही निवडणूक पार पडणार असल्याची माहीती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय ही निवडणूक कोरोनाच्या काळात असल्याने मतदारांनी देखील नियमांचे पालन करून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही विभागीय आयुक्तांकडून करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार पत्रकार परिषदेत बोलताना.

2 लाखांहून अधिक मतदार -

सगळ्यांचे लक्ष लागलेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. या निवडणूकीसाठी उमेदवारांबरोबरच प्रशासनासह सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीकरिता प्रशासन म्हणून केल्या जाणारी तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबतची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. या निवडणूकीत एकूण १९ उमेदवार आहेत. तर २ लाख ६ हजार ४५४ इतके मतदार आहेत. त्यामुळे मतदाना बाबतची नियमावली प्रत्येक मतदान केंद्रावर आणि शासनाच्या वेबसाईटवर दिल्याची माहितीही यावेळी आयुक्तांनी दिली.

हेही वाचा - 2022 मध्ये मुंबई पालिकेत भाजपचीच सत्ता - फडणवीस

या निवडणुकीसाठी नागपूरात एकूण १६२ मतदान केंद्र असणार आहे. शिवाय सहाही जिल्हे मिळून ३२० इतके मतदान केंद्र असणार आहे. असेही आयुक्त म्हणाले. विशेष म्हणजे या ही निवडणूक कोरोनाच्या काळात होत असल्याने मतदान केंद्रावर विशेष खबरदारी म्हणून फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि मतदारांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाबाबत अशा पद्धतीने नियोजन प्रशासन करत असल्याचे आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

निवडणुकीसाठी 1811 कर्मचारी -

या निवडणुकीसाठी एकूण १८११ कर्मचारी लागणार आहेत. त्यातील १००० कर्मचारी हे नागपूरसाठी असणार आहे. शिवाय या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्या जात असल्याचेही आयुक्त म्हणाले. ३ डिसेंबरला या निवडणूकीची मत मोजणी ही शहरातील मानकापूर स्टेडिअम येथे होणार असल्याची माहितीही यावेळी आयुक्तांनी दिली. मतदारांनीही कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

Last Updated : Nov 18, 2020, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.