नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून शंभर कोटींची खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारा उर्फ एलियास शकिलची चौकशी नागपूर पोलिसांकडून सुरू आहे. जयेशने चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
डी गॅंग टोळीतील सदस्यांसोबत संबंध : जयेश पुजाराचे बंदी घातलेली संघटनांसोबत संबंध आहे असे निष्पण्ण झाले आहे. याशिवाय त्याचे 'डी गॅंग' टोळीतील सदस्यांसोबत संबंध आहेत असा खुलासा देखील झाला आहे. जयेश पुजारावर गुन्हे केंद्रीय साखा, राज्याच्या तपास यंत्रणाच्या समनव्यातून दाखल करण्यात आले आहेत. कर्नाटक येथील कारागृहात आल्यानंतर त्यांची भेट काही गुंड टोळक्यांसोबत झाली होती. तेव्हा पासून तो कारागृहातन आपले रॅकेट चालवत होता, असा खुलासा अमितेश कुमार यांनी केला आहे.
फास्ट ट्रकमध्ये खटला चालवणार : लग्नाची फूस लावून ५७ वर्षीय शिक्षकाने १२ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संजय विठ्ठल पांडे असे नराधम शिक्षकाचे नाव असून आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शिक्षक गेली पाच महिने धमकी देत मुलीवर अत्याचार करत असल्याची बाब देखील तपासात समोर आली आहे. १२ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरण गंभीर आहे. फास्ट ट्रक कोर्टमध्ये खटला चालवला जाईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
वज्रमुठ सभेला अटी शर्तीसह परवानगी : १६ एप्रिलला नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला नागपूर पोलिसांनी अटीशर्ती घालून परवानगी दिली आहे. सभेला दहा हजार लोकं उपस्थित राहणार असल्याची माहिती महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही, महिला सुरक्षा, पार्किंग व्यवस्था यासह अटी लावण्यात आल्या आहेत. सभेला दहा हजार पेक्षा अधिक लोकं आल्यानंतर जर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती असल्यास लोकांना इतर थांबवले जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Asad Ahmed Encountered: माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि साथीदाराचे युपी पोलिसांकडून एन्काउंटर