ETV Bharat / state

गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच क्राईम..! महिला डॉक्टरांवर अ‌ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न - नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

सावनेर तालुक्यातील पाहिलेपार गावात महिलेवर अ‌ॅसिड सदृश्य द्रव्य फेकल्याची घटना घडली. या घटनेत डॉक्टर बचावल्या मात्र, द्रव्याचे शिंतोडे उडाल्याने त्यांच्या बाजूला असलेल्या एका महिलेसह एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. निलेश कन्हेरे असे आरोपीचे नाव आहे.

सर्वेसाठी गेलेल्या महिला डॉक्टरांवर ऍसिड सदृश्य हल्ल्याचा प्रयत्न

author img

By

Published : Feb 13, 2020, 5:52 PM IST

नागपूर - सावनेर तालुक्यातील पाहिलेपार गावात सर्वेसाठी आलेल्या डॉक्टरांवर अ‌ॅसिड सदृश्य द्रव्य फेकल्याची घटना घडली. या घटनेत डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे त्या बचावल्या मात्र, या द्रव्याचे शिंतोडे उडाल्याने बाजूला असलेल्या एका महिलेसह एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. निलेश कन्हेरे (वय २२) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

सर्वेसाठी गेलेल्या महिला डॉक्टरांवर अ‌ॅसिड सदृश्य हल्ल्याचा प्रयत्न

महिलांवरील अ‌ॅसिड हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वर्धा जिल्ह्यातील जळीतकांड अजून ताजेच असताना सावनेर तालुक्यात सर्वेसाठी गेलेल्या डॉक्टरांवर अ‌ॅसिड सदृश्य द्रव्य फेकण्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. 'नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन' च्या वतीने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३ डॉक्टरांना पहिलेपार येथे सर्व्हेसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा सर्वे सुरू असताना अचानक निलेश कन्हेरे या माथेफिरूने समोरून येत तुझा चेहरा खराब करतो असे म्हणत अ‌ॅसिड सारखे द्रव्य फेकले. मात्र, डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे त्या बचावल्या. परंतु, त्यांच्या बाजूला असलेली एक महिला आणि लहान मुलीच्या अंगावर या द्रव्याचे काही शिंतोडे उडाल्याने या दोघी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा - नागपुरात ३२ वारांगनांसह ६० ग्राहक पोलिसांच्या ताब्यात; गंगा जमुना परिसरात पोलिसांची करवाई

आरोपी हा घटनेवेळी दारू पिऊन होता असा देखील संशय आहे. जखमी महिला आणि मुलीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा - 'कोरोना' अफवेमुळे खव्वयांनी चिकन खाणे केले कमी; थेट पोल्ट्री उत्पादकांसह विक्रेत्यांवर परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.