ETV Bharat / state

बहुचर्चित विजया पांडुरंग तिवलकर खून प्रकरण : आरोपी नातीला प्रियकरासह अमरावती येथून अटक - grandmother murder update

१५ मेला नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सप्तक नगरात राहणाऱ्या ६२ वर्षीय विजया तिवलकर यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीच्या तपासात केली तेव्हा घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले नाही.

grandmother murder
आजीचा खून
author img

By

Published : May 17, 2021, 5:14 PM IST

नागपूर - बहुचर्चित विजया पांडुरंग तिवलकर या वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी ही त्यांचीच अल्पवयीन नात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी काल (रविवार) चार आरोपींना अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी म्हणजेच मृत विजया तिवलकर यांची नात ही प्रियकरासोबत पळून जाण्याचा यशस्वी झाली होती. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी या दोन आरोपींना अटक करण्यासाठी दोन पथके रवाना केली होती. आरोपी हे अमरावती येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या एका पथकाने तिथे जाऊन दोघांही ताब्यात घेतले.

१५ मेला नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सप्तक नगरात राहणाऱ्या ६२ वर्षीय विजया तिवलकर यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीच्या तपासात केली तेव्हा घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले नाही. त्यावरून पोलिसांनी या खून प्रकरणातील आरोपीला मृत महिला ओळखत असण्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार पोलिसांनी मृत विजया तिवलकर यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली असता घटनेनंतर त्यांची एक नात बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना कळाली तेव्हा तिचा शोध सुरू करण्यात आला होता. त्याच वेळी पोलिसांनी तिच्या मित्रांची चौकशी केली असता नातीने बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

हेही वाचा - नागपूरकरांनो लसीकरणासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी करा 'हे' काम

यानंतर पोलिसांनी निलेश पौनिकर (१८), कादिर उर्फ बाबा खान (१८), फरदिन खान (२२), आरजु उर्फ मोहम्मद कमर आलम (२०) या चार मित्रांना काल रात्री उशिरा अटक झाली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमरावती येथे आपले पथक पाठवले होते. आज सकाळी दोन्ही आरोपींना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.

हत्येमागील उद्देश्य काय -

पोलिसांच्या तपासात विजया तिवलकर यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. ते सर्व नागपूरमध्ये वास्तव्यास आहेत. विजया तिवलकर या २०१७मध्ये राज्य राखीव पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर मुलगा आणि मुलींपासून वेगळ्या म्हणजेच एकट्या राहत होत्या. आजीच्या घरात बक्कळ पैसा आहे. तो आपल्याला मिळाला तर आपल्याला अगदी आरामात शोक पूर्ण करता येतील हा त्यांचा खून करण्यामागील उद्देश होता. यामुळे त्यांच्या मुलीची मुलगी म्हणजे विजया यांच्या नातीने प्रियकर आणि इतर चार मित्रांच्या मदतीने आजीचा खून केला. आजीचा खून केल्यानंतर आरोपींनी घरातून काही पैसे आणि सोन्याचे दागिने नेल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा - नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; उपचार घेणाऱ्याची संख्याही घटली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.