ETV Bharat / state

Accidents On Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले; संशोधनातून 'हे' कारण आले समोर - accidents cases hikes on samruddhi highway

संमोहनामुळे समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी याबाबत संशोधन केले केले आहे.

Accidents On Samriddhi Highway
Accidents On Samriddhi Highway
author img

By

Published : May 12, 2023, 8:00 PM IST

Updated : Jul 1, 2023, 8:05 AM IST

नागपूर : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्य रेषा बदलावणारा मार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग असाच काहीसा प्रचार-प्रसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटना वेळी करण्यात आला. २२ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्ग हा लोकांसाठी खुला झाला त्यानंतर आजवर या मार्गावर शेकडो अपघात घडले आहेत. ज्यामुळे अनेकांच्या हसत्या खेळत्या संपूर्ण कुटुंबाचीचं राखरांगोळी झाली आहे. अगदी उद्घाटनाच्या दिवशीपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली.

अपघात होण्यामागे नेमके कारणे काय : अजूनही दररोज अपघात घडत आहेत. इतक्या उत्तम रस्त्याची निर्मिती केल्यानंतर देखील अपघात होण्यामागे नेमके कारणे काय आहे. हे जाणून घेण्यासाठी (VNIT) विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांनी अनेक दिवस अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. ज्यामध्ये हायवे- संमोहन नावाचा प्रकार पुढे आला आहे. प्रफुल मडधे, प्रतीक गजलेवार, विनय राजपूत, आयुष्य दूधबावरे अशी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव आहेत. हायवे संमोहन हा विषय नवीन आहे. रोजच्या रोज घडणाऱ्या अपघातांसोबत हायवे संमोहनचे काय नाते आहे याबद्दल तथ्य जाऊन घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने या विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा काही महत्वाचे मुद्दे पुढे आले आहेत.

अपघातांमुळे चिंता वाढली : डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहिल्या टप्याचे लोकार्पण झाले होते. नागपूर ते शिर्डी पर्यंतचे अंतर अवघे पाच ते सहा तासांवर आले. परंतु रोजच्या रोज होत असलेल्या अपघातांमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळेचं नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तीन महिने अभ्यास केला.

हायवे संमोहन म्हणजे काय : ज्यावेळी एखादा महामार्ग अगदीचं सरळ एका रेषेत तयार केला जातो, त्याचंवेळी चालकांच्या नजरेत एकसारखे दृश्य अनेकदा वारंवार येतात. स्पीड ब्रेकर, इतर अडथळ्यांशिवाय महामार्गावर गाडी तीव्र गतीने तासंतास धावते अशा वेळी हायवे संमोहित होते. शरीराच्या हालचाल स्थिर झाल्यासारख्या जाणवतात. त्यामुळे मेंदू क्रियाशील नसतो. त्यालाचं महामार्ग संमोहन असे म्हंटले जाते.

'हे' उपाय केल्यास अपघात कमी होतील : अगदी सरळ रेषेत निर्माण करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर 'लेन कटिंग' ओव्हर स्पीड हे अपघाताचे प्रमुख कारण आहेत. समृद्धी महामार्ग हा तीन पदरी असून दोन स्वतंत्र ट्रॅक आहे.

हेही वाचा

  1. Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या राजीनाम्यातून सगळ्यांना धडा मिळाला-अजित पवार
  2. Sharad Pawar for MVA stronger : महाविकास आघाडी मजबुतीची शरद पवारांची हाक, अजित पवारांच्या उपद्रवमूल्यावर प्रश्नचिन्ह
  3. CBSE Class 10 Results : सीबीएससी 10 वीचा निकाल जाहीर, जाणून घ्या कसा पहायचा दहावीचा निकाल

Last Updated : Jul 1, 2023, 8:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.