ETV Bharat / state

धक्कादायक..! वसतीगृह अधीक्षकाकडून दिव्यांग अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत - वसतीगृहात बलात्कार

काटोल येथील एका वसतीगृहात दिव्यांग अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वसतीगृह अधीक्षकास अटक करण्यात आली आहे.

file photo
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jun 6, 2020, 7:30 AM IST

नागपूर - काटोल येथे वसतीगृह अधीक्षकाने एका 14 वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अधीक्षक राजेंद्र काळबंडे (वय 44 वर्षे) यास पोलिसांनी अटक केली आहे.

इयत्ता सहावीत शिकणारी 14 वर्षीय पीडिता ही मागील पाच वर्षांपासून वसतीगृहात राहते. तीच्यावर मार्च महिन्यापासून नराधम अधीक्षकाने वारंवार बलात्कार केला. यातून ती गर्भवती झाली. त्यामुळे पीडितेच्या आईने व परिचारिकेने तीचा बळजबरीने गर्भपात केला. गर्भापात केल्यामुळे संबधित परिचारिका सिंधू देहनकर व पीडितेच्या आईसह तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी राजेंद्र काळबंडे याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) व अॅट्रॉसीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय आरोपीस अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक महादेव अचरेकर यांनी दिली.

हेही वाचा - कन्हान नदीच्या हरदास स्मशान घाटात दगडाने ठेचून अनोळखी व्यक्तीचा खून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.