ETV Bharat / state

Bus workers on strike : 'आपली बस'चे कर्मचारी वेतनवाढीसाठी बेमुदत संपावर - Bus workers on strike

शहरातील आपली बस सेवा पुन्हा ठप्प ( Aapali Bus service stopped again ) झाली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीच्या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

Bus workers
Bus workers
author img

By

Published : Mar 1, 2022, 12:14 PM IST

नागपूर : नागपूर शहराची आपली बस सेवा आज पुन्हा ठप्प झाली आहे. वेतन वाढीच्या मागणीसाठी आपली बसचे शहरातील चारही डेपोचे कर्मचारी संपावर ( Bus workers on strike ) गेले आहेत. वारंवार सांगूनही वेतन वाढ देत नसल्याने, अखेर आज कर्मचाऱ्यांनी अलटीमेंटम देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने बेमुदत संप पुकारला आहे. शहराच्या मोर भवन येथे एकत्र ( Employees gather at Mor Bhavan ) येत आंदोलन सुरू केले आहे. यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. महाराष्ट्रातील इतर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन वाढ द्या, अशी मागणी लावून धरली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीच्या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले

यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन आपली बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्याना ( Aapali bus contract staff ) वेतनवाढ कंत्राटदाराने दिली नाही. त्यामुळे अखेर संतप्त होऊन कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यात कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून शांत होतो. पण आता पुन्हा बस सेवा पूर्वरत सुरू झाली. आम्ही तुटपुंजा वेतनावर काम करत आहे. चतुर्थ कर्मचारी यांना जास्त वेतन मिळते. आम्हाला मात्र रोज शेकडो प्रवाशांना सेवा देत असतांना 8 ते 9 हजारात काम करावे लागत आहे. या महागाईत वेतनात काम करने शक्य नाही, म्हणत कर्मचारी संपावर गेले आहेत.

आपली बस सेवा -

नागपूर शहरात आपली बस सेवा ही मनपाच्या वतीने कंत्राटदाराच्या माध्यमातून चालवली जाते. यात सुमारे 400 बसेस असून शहरातील विविध भागात या बसेस धावत असतात. अचानक संपावर गेल्याने आज अनेक नागपूरकरांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. घराबाहेर आपल्या कामावर जाणाऱ्यांना आपली बस सेवा नसल्याने वेळेवर पोहचू शकले नाही. यासवर महानगर पालिका नेमका काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.