ETV Bharat / state

Aaditya Thackeray : 'विरोधकांना ईडीची भीती; आम्ही जयंत पाटलांच्या पाठिशी उभे' - Aaditya Thackeray on jayant patil ed inquiry

नागपुरात तीन विषय मोठे आहेत. यामध्ये एक अजनीवन, दुसरा कोल वॉशरीज आणि तिसरा ऊर्जा निर्मिती प्रकल्पतून निघणाऱ्या राखेमुळे होणारे प्रदूषण. तीनही विषय पर्यावरणाशी निगडित आहेत. पर्यावरणाचे नुकसान होतं असल्याने आमच्या सरकारच्या काळात कोल वॉशरीज बंद करण्यात आल्या होत्या. मात्र या सरकारने त्या पुन्हा सुरु केल्या आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच विरोधकांना ईडीची भीती दाखवली जात आहे. आम्ही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या पाठीशी उभे असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे
author img

By

Published : May 22, 2023, 6:02 PM IST

आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलताना...

नागपूर : युवासेना अध्यक्ष आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होताचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केलं. मी मंत्री असताना अजनी वन प्रकल्पाला स्थगिती दिली होती पण ती स्थगिती देखील या सरकारने उठवली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते.

सत्याच्या बाजूने लढणाऱ्या विरोधकांना ईडीची भीती दाखवण्यात येत आहे. हा प्रकार संपूर्ण देशात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. आम्ही त्यांच्या सोबत आहोत - आदित्य ठाकरे

विधानसभेत प्रश्न उचलणार : कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील सहा युनिट बंद करून त्या ऐवजी ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन युनिट लावण्यात येणार आहेत. या युनिट विरोधात स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या संदर्भात प्रश्न मी विधानसभेत उचलणार आहे अस आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. यावेळेस नागपुरातील अजनी वन, कोल वॉशरीज आणि ऊर्जा निर्मिती प्रदूषणाच्या विषयात लक्ष घालणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

विरोधकांना ईडीची भीती : सत्याच्या बाजूने लढणाऱ्या विरोधकांना ईडीची भीती दाखवण्यात येत आहे. हा प्रकार संपूर्ण देशात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, मात्र आम्ही त्यांच्या सोबत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. कार्यालयात दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. ईडी आणि कार्यालयाबाहेर आणि पाटील यांच्या घराबाहेर समर्थकांनी गर्दी केली आहे. दरम्यान चौकशीला जाण्याआधीच जयंत पाटील यांनी ट्विट केले.या ट्विटमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मुंबईला न येण्याचे आवाहन केले. पक्षाचे कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजपाविरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत.

हेही वाचा : 1. Fire Outbreak In Thane : मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात दोन घरांना भीषण आग, 4 जण होरपळले

2. Sanjay Raut On Modi : पंतप्रधान मोदी लहरी राजा, नोटाबंदीचा निर्णय लहरीपणातून घेतला -संजय राऊत

3. Pune Crime News : पुण्यात आता चपलांचीही चोरी! चोरट्यांनी गोडाऊनमधून चोरल्या 40 हजारांच्या चपला!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.