ETV Bharat / state

नागपुरात मतदारांनी धरला कॉंग्रेसचा हात; मात्र नेताच बेपत्ता असल्याने घड्याळचे काटे फिरले विरुद्ध दिशेने - नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका

नागपूर जिल्हा परिषद 58 जागा असून यात बहुमतासाठी 30 जागेची गरज असताना 31जागा काँग्रेसकडे होत्या. आता झालेल्या 16 जांगांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने 10 जागा लढवल्या असून त्यात 9 जागा जिंकल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीने 5 जागा लढवल्या असुन त्यांनी 2 जागेवर विजय मिळवला आहे. सोबत असलेल्या शेकापने आणि गोंडवाना यांनी एक मिळवली आहे. भाजपने 16 जागा लढवल्या असून 3 जागेवर विजय मिळवला आहे.

a-setback-to-the-ncp-and-bjp-congress-bagged-33-of-the-58-seats-in-nagpur-zp
नागपुरात मतदारांनी धरला कॉंग्रेसचा हात; मात्र नेताच बेपत्ता असल्याने घड्याळचे काटे फिरले विरुद्ध दिशेने
author img

By

Published : Oct 7, 2021, 7:23 AM IST

Updated : Oct 7, 2021, 3:51 PM IST

नागपूर - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचे निकाल बुधवारी जाहीर झाले. नागपुरात काँग्रेसचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने सत्ता राखण्याबरोबरच अधिकच्या जागांवर विजयी होण्यात यश मिळवले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालामध्ये एकूण 16 जागेपैंकी झालेल्या जागेमध्ये काँग्रेसने 09, राष्ट्रवादी 02, भाजप 03 आणि शेकाप आणि गोंडवाना प्रत्येकी 01 जागा मिळवली. पण राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला मात्र गेल्यावेळची एक जागा तर गमवावी लागलीच शिवाय 11 पैकी एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

नागपुरात मतदारांनी धरला कॉंग्रेसचा हात;

नागपूर जिल्हा परिषद 58 जागा असून यात बहुमतासाठी 30 जागेची गरज असताना 31जागा काँग्रेसकडे होत्या. आता झालेल्या 16 जांगांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने 10 जागा लढवल्या असून त्यात 9 जागा जिंकल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीने 5 जागा लढवल्या असुन त्यांनी 2 जागेवर विजय मिळवला आहे. सोबत असलेल्या शेकापने आणि गोंडवाना यांनी एक मिळवली आहे. भाजपने 16 जागा लढवल्या असून 3 जागेवर विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादीला फटका-

या पोटनिवडणुकी दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल मतदारसंघातून बेपत्ता होते. त्यामुळे राष्ट्रवादीने ही निवडणूक रामभरोसेच पार पाडली. त्यामुळे काटोल तालुक्यात भाजपला संधी मिळाली. याठिकाणी पारडसिंग जिल्हा परिषदेच्या सर्कलमधून मीनाक्षी सरोदे यांनी बाजी मारली, तेच शेतकरी कामगारपक्षाचे समीर उमप यांनी येणवा येथे जागा कायम ठेवली आहे. तसेच नरखेड तालुक्यात सावरगाव तालुक्यातील सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपच्या उमेदवार पर्वती कालबांडे यांनी विजय मिळवला. तर पंचायत समितीमध्येही राष्ट्रवादीला धक्का बसला असून सावरगाव पंचायत समितीमध्ये भाजपच्या स्वप्नाली नागपुरे यांनी अवघ्या दोन मताने विजय मिळवला आहे. यामध्ये कॉंग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला असून त्यामुळे काँग्रेसला थोडा फटका बसला आहे.

सुनील केदारांच्या नेतृत्वात काँग्रेस यशस्वी-

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात निवडणूक वाढवण्यात आली. त्यांचा मतदार संघ असलेल्या सावनेर तालुक्यात 5 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषद सर्कलवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. वाकोडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये ज्योती शिरकसर यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. तसेच केळवाद येथेही सुप्रिया कुंभारे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

हिंगणा तालुक्यातील डिगडोह येथील जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रश्मी कोटगुले या विजयी झाल्या आहेत. निलडोह जिल्हा परिषद सर्कलमधून कॉंग्रेसचा संजय जगताप यांनी विजय मिळवला. तेच इससानी जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपच्या अर्चना गिरी असून यात तिन्ही उमेदवारांनी पुन्हा निवडणूक जिंकली आहे.

काँग्रेसकडून भाजपा नेत्यांना चपराक-

कामठी मतदार चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री राहिले असून मागील निवडणुकीत भाजपचे आमदार टेकचंद सावरकर हे आमदार आहे. या तालुक्यात दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. वडोदा जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसच्या अवंतीक लेकुरवाळे यांनी भरघोस लीड घेतली आहे. तेच गुमथळा येथून दिनेश ढोले यांनी भाजप समर्थन असलेलल्या अनिल निदान यांचा पराभव केला. याठिकाणी महालगाव आणि बीडगावं या दोन्ही पंचायत समितीत भाजपचा पराभव करत काँग्रेसने विजय मिळवला आहे. पण भाजपला कामठीमध्ये पोटनिवडणुकीत सुनील केदार यांचा पंजा चालला असून कमळ मात्र पूर्णतः कोमजले आहे. यात भाजपनेही पराभावाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. काँग्रेसने सत्तेचा दुरुउपयोग केल्याने मतदारांनाच कल काँग्रेसकडे गेल्याच आरोप भाजपा नेते बावनकुळे यांनी केला आहे.

काँग्रेसच्या जागेत वाढ, राष्ट्रवादीत घट-

सध्याचे पक्षीय बलाबल पाहता यात काँग्रेस, भाजपला फायदाच झाला आहे. मात्र राष्ट्रवादीला फटका बसला आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ दोन जागेने वाढले असून आता 31 वरून 33 जागा झाला आहेत. तर राष्ट्रवादीकडे 10 जागा होत्या पण नव्याने त्यांना 2 जागेवर पराभव झाला असून संख्याबळ 8 झाले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत असलेल्या शेकापने 1 जागा कायम ठेवली. गोंडवाना गणतंत्र पार्टीने 1 जागा मिळवत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. भाजपकडे यापूर्वी 15 जागा होत्या, यात 1 जागा गमावली असून सध्याचे संख्याबळ 14 झाले आहे. सेनेकडे 1 जागा होती ती जागाही गमावली शिवसेनेने गमावली आहे. शिवसेनेने 11 जागेवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकही जागा मिळवण्यात सेनेला यश आलेले नाही.

आरक्षण महागाईमुळे भाजपाला नाकारले; तर भाजप म्हणते काँग्रेसकडून सत्तेचा गैरवापर-

यामध्ये काँग्रेसचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी भाजपर जोरदार हल्ला चढवला आहे. यात भाजपने ज्या पद्धतीने ओबीसीचे राजकीय अरक्षणाचा मुद्दावरून राजकारण करत निवडणूक लढवली, त्यामुळे तसेच वाढत्या महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढने भाजपला नाकारल्याचे मत व्यक्त केले आहे. तेच या निवडणुकीत भाजपचा पराभवामागे खापर काँग्रेसवर फोडले आहे. काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केला आहे. पैसा प्रशासन यांचा सत्तेत असल्याने फायदा करून घेत विजय मिळवला आहे. तसेच ही निवडणूक ओबीसींचा मुद्यावरून झाली नसून या निवडणुकीचा काहीही परिणाम पुढील निवडणुकीत भाजपसाठी होणार नसल्याचे मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

पंचायत समितीतही काँग्रेससचीच सरशी-

पंचायत समितीच्या 31 जागेवर निवडणुक झाली असून यामध्ये भाजपला 2 जागा वाढत 6 जागा मिळाल्या आहेत. पण येथेही काँग्रेसने अधिक जागा जिंकल्या असून काँग्रेसकडे पूर्वी 19 जागा असून दोन जागा वाढत 21 जागा झाल्या आहेत. राष्ट्रवादी पाच ठिकाणी लढली असून तीन जागा गमावल्या आहेत. सोबतच शिवसेने 2 जागा गमावल्या आहेत. वंचितने 1 जागा गमावली आहे, तेच गोंडवाना गणतंत्र पार्टी 1 आणि बसपाने जागा जिंकत पंचायत समितीच्या प्रवेश केला आहे.

हेही वाचा - कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यानेच झेडपीच्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला यश- नाना पटोले

हेही वाचा - पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल जाहीर; खासदार राजेंद्र गावितांच्या पुत्राचा पराभव

Last Updated : Oct 7, 2021, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.