ETV Bharat / state

नागपूरच्या विवाहितेवर नवऱ्यासह दिर अन् सासऱ्याने केला बलात्कार, गुन्हा दाखल - नागपूर जिल्हा बातमी

नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्यात राहणाऱ्या तरुणीचा 4 फेब्रुवारीला जळगावच्या पाळोरा येथील जगदीश सुका पाटीलसोबत झाला होता. मात्र, लग्नाच्या काही दिवासांनी नवऱ्यासह दिर व सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडितेच्या वडिलांनी जाब विचारला असता मुलीला 1 लाख 60 हजारांत विकत घेतल्याचे पाटील कुटुंबियांनी सांगितले. या प्रकरणी पारोळा येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून ज्यांनी मुलीला विकले त्यांच्या विरोधात नागपूर येथे गुन्हा दाखल झाला आहे.

nagpur
पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 24, 2021, 5:53 PM IST

Updated : Mar 24, 2021, 8:08 PM IST

नागपूर - नागपूर शहराच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडेवाडी परिसरात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत काहींनी तिला एक लाख साठ हजारांत विकले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील जगदीश सुका पाटील नावाच्या व्यक्तीशी लग्न लावून दिले. मात्र, त्या ठिकाणी संसार सुरू करताच पीडित तरुणीवर तिच्या नवऱ्याने, दिराने आणि सासऱ्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पीडित तरुणीने वडिलांशी संपर्क केल्यानंतर ही घृणास्पद घटना समोर आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून जळगावच्या पारोळा येथे गुन्हा दाखल झाला आहे. सध्या ही पीडिता नागपूरला परत आली आहे. ज्यांनी तिची विक्री एक लाख साठ हजार रुपयांमध्ये केली होती, त्यांच्या विरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नागपूरच्या विवाहितेवर नवऱ्यासह दिर अन् सासऱ्याने केला बलात्कार, गुन्हा दाखल
पीडित तरुणी ही भांडवाडी परिसरात राहते. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने तिच्या वडिलांसमोर तरुणीचे लग्न कसे करायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पीडितेची मावशी ही भंडारा जिल्ह्यात राहते. तिलाही त्यांची आर्थिक परिस्थिती माहीत होती. मावशीने भंडारा येथील काही लोकांच्या मदतीने पीडितेसाठी जळगावच्या पारोळा येथील रहिवासी 27 वर्षीय जगदीश सुका पाटील नामक तरुणाचा प्रस्ताव आणला होता. मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे रितिरिवाजा प्रमाणे 4 फेब्रुवारीला लग्न लावून दिले. पीडिता नांदायला जगदीश सुका पाटील यांच्या घरी गेली. त्यानंतर काही दिवस व्यवस्थित गेले. मात्र, लग्नाच्या 8 दिवसांनी पीडितेच्या दिराने ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीने या संदर्भात नवऱ्याकडे तक्रार केल्यानंतर त्याने देखील या कृत्याचे समर्थन केल्याने पीडिताला धक्का बसला. त्यानंतर रोज हा प्रकार घडू लागला होता. त्याच दरम्यान सासऱ्यानेही पीडितेवर बलात्कार केल्याने तिला जबर मानसिक धक्का बसला होता. तिने सासूकडे घडलेल्या घटनांची तक्रार केली. त्यानंतरही काहीही उपयोग होत नसल्याने पीडितेने शेजारी राहणाऱ्या काही लोकांच्या मदतीने वडिलांसोबत मोबाईल संपर्क केला आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली. वडिलांनी लागलीच पारोळा येथे जाऊन मुलीला परत घेऊन निघाले असता पाटील कुटुंबियांनी त्याची वाट अडवून धरली. आम्ही मुलीच्या बदल्यात 1 लाख 60 हजार रुपये मोजल्याची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उडकीस आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने तरुणीची सुटका झाल्यानंतर पारोळा पोलीस ठाण्यात आरोपी जगदीश सुका पाटील, पंकज सुका पाटील आणि सुका पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील दलालांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने पीडित तरुणीने नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दलालांविरोधात कारवाई व्हावी

या संपूर्ण प्रकरणात दलालांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने पीडित तरुणीने काही सामजिक कार्यकत्यांच्या मदतीने पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्यांनी माझी विक्री केली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना देखील शिक्षा मिळावी, अशी मागणी पीडितेने केली आहे.

हेही वाचा - फेसबुक मित्राकडून अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून बलात्कार; आरोपीला अटक

Last Updated : Mar 24, 2021, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.