ETV Bharat / state

नागपुरात नव्याने आढळले आठ कोरोना रुग्ण; एकूण आकडा ४५४

गुरुवारी नागपुरात कोरोनाचे आठ रुग्ण आढळले तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी देखील १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५४ इतकी झाली आहे.

Nagpur Government Hospital
नागपूर शासकीय रुग्णालय
author img

By

Published : May 29, 2020, 7:38 AM IST

नागपूर - उपराजधानीत दोन दिवसांत २० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. गुरुवारी नागपुरात कोरोनाचे आठ रुग्ण आढळले तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी देखील १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५४ इतकी झाली आहे.

गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये चार रुग्ण मोमीनपुरा येथील आहेत तर दोन रुग्ण टिपू सुलतान चौक येथील आहेत. याशिवाय अजनी आणि सिरसपेठ येथील प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाली. देशात सर्वाधिक रिकव्हरी रेट असलेल्या नागपूरात गेल्या दोन दिवसात २० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. आत्तापर्यंत नागपुरात ३६४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.