नागपूर : ट्रक आणि भरधाव तवेरा गाडीत झालेल्या भीषण धडकेत ( Truck Tavera Accident ) सात जणांचा मृत्यू झाल्याची ( 7 Death In Road Accident ) खळबळजनक घटना नागपूर जिल्हातील उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्याजवळ घडली ( Accident Near Umargaon In Nagpur ) आहे. या अपघातात लहान मुलगी गंभीर जखमी झाली ( Child Injured In Accident ) आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तवेराचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.
असा झाला अपघात : तवेरा गाडी उमरेडकडून नागपूरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी उमरगाव फाट्याजवळ तवेरा गाडीच्या चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तवेराचा वेग जास्त असल्याने त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि तवेरा ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळ हे उमरेड मार्गावर असल्याने कुही आणि उमरेड ठाण्याचे पोलीस स्टाफ घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र घटनास्थळ हे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हुडकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
एक बालिका बचावली : ट्रक आणि भरधाव तवेरा गाडीत झालेल्या अपघातात एक छोटी बालिका वाचली आहे. मात्र ती गंभीर जखमी असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
हेही वाचा : Sangli Accident : सांगलीत आयर्विन पुलावर भीषण अपघातात दोन जण ठार, तर आठ जण जखमी