नागपूर - जिल्ह्यातील अदासा येथे शुक्रवारी दुपारी ४ महिला मजुरांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर, २ महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या महिलांची नावे अद्याप पुढे आलेली नाहीत.
अदासा येथे लघु पाटबंधारे विभागाचा बंधारा (छोटा बांध) बांधला जात असताना दुपारी अचानक मातीचा ढिगारा कोसळला. या ठिकाणी ६ महिला काम करत होत्या. ढिगारा कोसळल्याने या सहाहीजणी त्याखाली दबल्या. त्यापैकी दोघींना वाचवण्यात यश आले. मात्र, इतर ४ महिला मजूर माती खाली दबून त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - देवेंद्र फडणवींसाच्या भाग्यात 'हे' पद फारकाळ नाही.. भैय्याजी जोशींनी वर्तवले भविष्य
या प्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार आणि त्याच्या सुपरवायजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातातील सर्व मृतक हे मध्यप्रदेशातील राहणारे आहेत. तर, मृतकांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
हेही वाचा - हिंदूंच्या सहिष्णुतेला कमजोरी समजू नका, वारिस पठाणांना फडणविसांचा इशारा