नागपूर - जिल्ह्यात शनिवारी 4 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर, 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या नव्या रुग्णांमुळे नागपुरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 416 वर पोहोचली आहे. तर यापैकी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 334 झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये नागपूर ग्रामीणमधील तिघांचा समावेश आहे. यात सावनेर तालुक्यातील दहेगाव येथील 1 जण तर हिंगणा तालुक्यातील बुटीबोरी येथील दोघांचा समावेश आहे. बुटीबोरी येथील 25 वर्षीय मुलगा व त्याचे 52 वर्षीय वडील यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 25 वर्षीय मुलगा 8 दिवसांपूर्वी मुंबईहून परत आला होता.
याशिवाय, नागपूर शहरातील सीए रोडवरील एका भिक्षेकऱ्याचा(भिकारी) अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये 1 महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या नागपुरात 77 रुग्णांवर मेयो आणि मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.