नागपूर - सरकारी अहवालातून नागपूर विभागात २०१८ या वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.विभागातील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहीतीही समोर आली आहे.
सरकारच्या कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यातच ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि शेतमालाला योग्य हमी भाव नसल्याने शेतकरी आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विदर्भात कृषी महाविद्यालय अनेक आहेत. मात्र, जमीन कोणत्या पीकासाठी योग्य आणि कोणत्या पीकासाठी अयोग्य याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांना कृषी महाविद्यलयाकडून आवश्यक ती मदत मिळत नाही.
पीक घेतलावर त्या पिकाच्या संरक्षणासाठी किटकनाशक फवारणी आणितणनाशाक फवारणी करताना शेतकऱ्यांकडून योग्य काळजी घेतली जात नाही. कीटकनाशक किती घातक असतात याची कल्पना नसल्याने फवारणीमुळे दगावलेले शेतकरीसुद्धा यामध्ये आहेत, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलरकर यांनी दिली.