ETV Bharat / state

Birds School In Nagpur : २१ वर्षांची अबोल निस्वार्थ मैत्री, सतपुरुष वानखेडेंच्या अंगाखांद्यावर भरते पक्षांची शाळा - सतपुरुष वानखेडे

नागपूरमध्ये निस्वार्थी मैत्री पहायला मिळाली आहे. अंबाझरी उद्यानात सतपुरुष वानखेडेंच्या अंगाखांद्यावर पक्षांची शाळा भरते. 21 वर्षे ही शाळआ दैनंदिन रित्या भरत आहे. 58 वर्षीय मोटारसायकल सतपुरुष वानखेडे मेकॅनिक आहेत. रोज रात्री ते पक्षांच्या खाऊची तयारी ( Prepared food at night ) करून ठेवतात. पक्षी देखील अक्षरशः किलबिलाट करून उद्यानात त्यांचे स्वागत ( Welcome with birds chirping ) करतात.

animal bird lover
पशु,पक्षी प्रेमी
author img

By

Published : Jul 26, 2022, 5:19 PM IST

नागपूर - आजपर्यंत आपण सर्वांनी मैत्रीचे अनेक किस्से बघितले आणि अनुभवले आहेत. मैत्री निस्वार्थी भावनेतून असेल तर ती संपूर्ण आयुष्यभराची संपत्ती होते. आणि त्याच मैत्रीत स्वार्थ लपलेले असेल तर त्या मैत्रीला फार काही आयुष्य नसते. म्हणून मुक्या प्राण्यांसोबत केलेली मैत्री सर्वात निस्वार्थी असते. अशीच काहीशी मैत्री सध्या नागपुरातील ( Nagpur ) नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही मैत्री आहे 21 वर्षांची . ही मैत्री आहे 58 वर्षीय मोटारसायकल मेकॅनिक सतपुरुष वानखेडे यांची जे पशु,पक्षांवर प्रेम करतात ( Animal Bird Lover). आणि अंबाझरी उद्यानातील ( Ambazari Park ) विविध प्रकारचे शेकडो पक्षी, खारुताई आणि प्राण्यांची बोलतात. पशू-पक्षी आपली भाषा समजू शकत नाहीत. मात्र,सतपुरुष वानखेडे अक्षरश पक्षांसोबत संवाद साधतात ( Talk With Birds ) . पक्षी देखील त्यांनी केलेल्या आदेशाचे पालन करताना दिसून येतात. सुखद म्हणजे रोज सकाळी-सकाळी किमान तास-दोन तास सतपुरुष वानखेडे यांच्या अंगाखांद्यावर पक्षांची शाळाच भरते.

पशु,पक्षी प्रेमी

रात्रीत पक्षांच्या खाऊची तयारी - सकाळी उठल्यापासूनच सतपुरुष वानखे ( Satpurush Wankhede ) यांना अंबाझरी गार्डनमध्ये जाण्याची घाई असते. ते रात्रीत पक्षांच्या खाऊची तयारी ( Prepared food at night ) करून ठेवतात. सतपुरुष बगीच्याच्या प्रवेशद्वारावरून येताना दिसताचं पक्षी अक्षरशः किलबिलाट करून त्यांचे स्वागत ( Welcome with birds chirping ) करतात. त्यानंतर अंबाझरी उद्यानाच्या एकांतात सतपुरुष वानखेडे आणि पक्षांची शाळा ( Birds school )भरते. कुणाचाही व्यत्यय येऊ नये म्ह्णून ते उद्यानाच्या एका बाजूला पक्षांच्या जेवणाची व्यवस्था करतात.

२१ वर्षांची निखळ, निस्वार्थ प्रेमाची मैत्रीचा प्रवास - सतपुरुष वानखेडे यांचे अंबाझरी परिसरातचं निवास असल्याने ते अगदी लहान वयापासूनच अंबाझरी उद्यानात येतात. तारुण्यात आल्यानंतर ते रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी ( Morning Walk ) येऊ लागले. वॉक झाल्यानंतर भूक लागते म्हणून ते घरूनचं फळ किव्हा इतर काही खाद्यपदार्थ खिशात टाकून आणायचे. फळ खाताना काही तुकडे ते पक्षांना टाकायचे. तेव्हा पक्षांचे थवे त्यांच्या शेजारीचं घुटमळत राहायचे. त्यानंतर त्यांनी पक्षांसाठी रोज खाऊ आणायला सुरुवात केली. बघता बघता उद्यानातील सर्व पक्षांना त्यांची सवयचं झाली.

२१ वर्षात एकही दिवस खंड नाही - अंबाझरी उद्यानातील सर्वच पक्षी खारुताई आणि पशुंना सतपुरुष वानखेडे यांची सवय झालेली आहे. एखाद्या वेळेस त्यांना येण्यास विलंब झाला तर हे पक्षी उद्यानाच्या गेटवर येऊन त्यांची वाट बघत असतात. या 21 वर्षात एकही दिवसाचा खंड त्यांनी पडू दिला नाही. ज्यावेळी त्यांना येणं शक्य होत नाही त्यावेळेस सत्पुरुष वानखेडे यांचा मुलगा येऊन वडिलांनी सुरू केलेली पशु,पक्षी सेवाव्रतचं काम पुढे नेतो.

रोजच्या मिळकतीतील एक भाग पक्षांसाठी - सतपुरुष वानखेडे हे दुचाकी दुरुस्तीचे काम करतात. दिवस भर काम केल्यानंतर मिळणाऱ्या कमाईचा एक भाग ते पक्षांसाठी दाणे विकत घेण्यासाठी खर्च करतात. एक दिवसाचा खर्च हा 200 ते 300 रुपयांपर्यंत होतो. जमेल त्या पद्धतीने ते पक्षांसाठी दाणे विकत आणण्यात. मात्र,कुणाकडेही मदतीची याचना करत नाहीत. जमेल तो पर्यंत हे सेवाव्रत जोपासण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे.

हेही वाचा - Breaking अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.