ETV Bharat / state

वंदे भारत मिशन : रशियात अडकलेले २०० विद्यार्थी मायदेशी परतले

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले, चारशे विद्यार्थी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रशियामध्ये अडकले होते. त्यापैकी २०० विद्यार्थीना आज 'वंदे भारत मिशन' अंतर्गत मायदेशी परत आणण्यात आले आहे.

200 stranded MBBS students return Nagpur from Russia
वंदे भारत मिशन : रशियात अडकलेले २०० विद्यार्थी मायदेशी परतले
author img

By

Published : Jun 18, 2020, 2:44 PM IST

नागपूर - वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले, चारशे विद्यार्थी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रशियामध्ये अडकले होते. त्यापैकी २०० विद्यार्थीना आज 'वंदे भारत मिशन' अंतर्गत मायदेशी परत आणण्यात आले आहे. आज पहाटे विशेष विमानाने हे सर्व विद्यार्थी नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

राज्यातील चारशे विद्यार्थी, रशियाला वैद्यकीय शिक्षणाकरिता गेले होते. तेव्हा अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, यामुळे ते रशियात अडकून पडले होते. तेव्हा या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार प्रकाश गजभिये यांनी मोहीम सुरू केली होती. त्यांनी याअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या पालकांची कैफियत मांडली होती.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरिल दृश्य...

आमदार गजभिये यांच्या पाठपुराव्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारशी बोलणी करून त्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था केली. आज मास्को शहरातून ४०० पैकी २०० विद्यार्थांना घेऊन, विशेष विमान नागपूरला आले. सर्व विद्यार्थांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच त्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - नगरसेवक अन् शासकीय डॉक्टरसह आठ जण ताब्यात, एका बंगल्यात खेळत होते जुगार

हेही वाचा - नद्यांच्या पुनरुज्जीवनाने नागपूरच्या वैभवात भर, नाग नदीसह पिवळ्या नदीला मिळाले मूळ स्वरूप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.