ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील १६ जणांना कोरोना - nagpur collage corona

एक-दोन नव्हे, तर तब्बल १६ जणांना एकाचवेळी कोरोनाची बाधा झाल्यामुळे नागपुरातील प्रसिद्ध दीक्षाभूमी शेजारी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर महापालिकेने सील केले असल्याची माहिती पुढे आली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar College Corona
कॉलेज कर्मचारी कोरोना नागपूर
author img

By

Published : Feb 23, 2021, 10:35 PM IST

नागपूर - एक-दोन नव्हे, तर तब्बल १६ जणांना एकाचवेळी कोरोनाची बाधा झाल्यामुळे नागपुरातील प्रसिद्ध दीक्षाभूमी शेजारी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर महापालिकेने सील केले असल्याची माहिती पुढे आली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व जण हे महाविद्यालयातील कर्मचारी आहेत.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

हेही वाचा - नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडाचा खून

लक्ष्मीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांनी महाविद्यालयासमोर प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे फलक लावले आहे. महाविद्यालयात एकाचवेळी १६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे, सामूहिक प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने आठवडाभरासाठी डॉ. आंबेडकर कॉलेजचा परिसर सील करण्यात आला आहे. महाविद्यालय प्रशासनाला परिसर सॅनिटाईज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील कोरोनाबाधितांवर विविध ठिकाणी उपचार करण्यात येत आहे. आठवडाभरानंतर महाविद्यालयाचा परिसर उघडायचा का? याचा निर्णय घेण्यात येईल, असे राठोड यांनी स्पष्ट केले.

पाटणसावंगीतही १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथील एका शाळेच्या १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे सर्व विद्यार्थी पाटणसावंगी येथील आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. एवढेच नाही तर, शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, सुरक्षेच्या कारणास्तव शाळा पुढील १० दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ विद्यार्थ्यांची आणि मुख्याध्यापिकेची प्रकृती उत्तम आहे.

हेही वाचा - नागपूरात मॅफेडॉन अमली पदार्थांसह दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.