नागपूर - आजच्या युगातील कोणत्याही क्षेत्रात महिला मागे राहिलेल्या नाहीत. कुस्ती सारख्या ताकदीच्या खेळातही त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. मात्र, एखाद्या पुरुषासोबत कुस्ती जिंकणाऱ्या महिला फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. मौदा तालुक्यातील कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाच्या अपूर्वा देवगडनं मुलाला धोबीपछाड देत पारितोषिक पटाकावले आहे.
हेही वाचा - पाकच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झालेले आर्थर आता 'या' संघाचे मुख्य प्रशिक्षक
मौदा तालुक्यातील तिवसा गावात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेलूची १४ वर्षीय अपूर्वा देवगड आकर्षणबिंदू ठरली. अपूर्वाने आखाड्यात मुलाला धोबीपछाड देत पारितोषिक मिळवले आहे. शिवाजी व्यायाम शाळेतर्फे तिवसा गावात दरवर्षी ही कुस्तीस्पर्धा आयोजित करण्यात येते. विदर्भातील महिलांना कुस्तीमध्ये चांगली संधी मिळत असल्याचे या स्पर्धेतून समोर आले आहे.