ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळ: कोकणात गेलेल्या महावितरणच्या 11 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

महावितरणचे कर्मचारी निसर्ग चक्रीवदळानंतर तेथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रायगडमध्ये गले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोकणात गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे ठरविले आहे. तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

corona-positive
कोरोना
author img

By

Published : Jul 6, 2020, 12:59 PM IST

नागपूर - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भात झपाट्याने वाढत आहे. अनेक नेते, मंत्री, पोलीस, डाॅक्टर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सरकारी कार्यालयातही कोरोना घुसला आहे. सुरुवातीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने धुमाकूळ घातला. आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. केवळ दोन दिवसांत विदर्भात महावितरणच्या ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

कोरोनाबाधित आढळलेल्या ११ कर्मचाऱ्यांपैकी वर्धा जिल्ह्यातील ९, नागपूर जिल्ह्यातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील 3 तर देवळी आणि पुलगावचे प्रत्येकी एक कर्मचारी कोरोना पॉसिटिव्ह आढळले आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील वाडी आणि बुटीबोरीमधील कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहे.

महावितरणने कर्मचारी निसर्ग चक्रीवदळानंतर तेथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रायगडमध्ये गले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोकणात गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे ठरविले आहे. तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यातून ३५० पेक्षा कर्मचारी कोकणात गेले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील वाडीमध्ये महावितरणचा कोरोनाबाधित आलेला कर्मचारी राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.