नागपूर - मकरसंक्रांत म्हंटलं की पतंग आलीच, पतंग उडविण्याची खरी मजा दुसऱ्या पतंगीबरोबर पेंच लावून कापण्यात असते. मात्र, या पतंग उडवण्याच्या आणि पेच लावण्याच्या नादात वापरण्यात येणाऱ्या नॉयलॉनच्या मांजामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पक्षी जखमी होऊन त्यांचा मृत्यू होतो.
मकरसंक्रांत आणि पतंग यांच आगळंवेगळं नात आहे. दरवर्षी संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जाते, पेच लढवली जाते. मात्र, पतंग प्रेमींच्या हौशीसाठी वापरला जाणारा नायलॉन आणि चायनिज मांजा हा पक्षांच्या जीवावर बेततो, याचे भान पतंगप्रेमींना होत नाही. पतंग उडवताना ती अनेक ठिकाणी अडकते. यावेळी तिच्याबरोबर हा मांजाही अडकून पडतो. झाडांच्या फांद्या, विद्युत खांब, इमारतीपासून तर अगदी रस्त्यापर्यंत नायलॉन मांजामुळे दरवर्षी पक्षी जखमी होत असतात आणि बरेच मृत्यूमुखी पडतात.
हेही वाचा - उच्चशिक्षित महिला चोर पोलिसांच्या अटकेत, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त
वनविभागाच्या उपचार केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात यावर्षी संक्रातीमध्ये १५ जानेवारीला १०० पक्षांचा मृत्यू झाला. तर, हाच आकडा २०१९ मध्ये ३५०, २०१८ मध्ये ६६६ आणि २०१७ मध्ये १ हजार २०० असल्याची माहिती आहे. मांजामुळे अनेक पक्षी त्यात अडकून पडतात. त्यांना वाचवण्याचे काम ही उपचार केंद्राची टीम करते. उपचार केंद्रात आणलेल्या पक्षांवर येथील ऑपरेशन थिएटरमध्ये उपचार केले जातात. येथे त्यांचे एक्सरे काढण्याची सोय देखील आहे. तसेच उपचारानंतर त्यांना वेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात येते.
पतंगप्रेमींच्या हौशीमुळे पक्षांचा विनाकारण बळी जात असल्याने मांजा पूर्णपणे बंद करावा आणि या पक्षांचे प्राण वाचवावे असे या उपचार केंद्रातील लोकांचे म्हणणे आहे. एकीककडे मांजामुळे माणसांनाच इजा होते, मग तर हे मुके पक्षी आहेत. गगन भरारी घेणारे हे पक्षी मांजापासून अनभिद्य असतात आणि प्रत्येक वर्षी त्यांचा नाहक बळी जातो त्यामुळे पक्षीप्रेमीदेखील अशा मांजाला बंद करण्याची मागणी करताहेत.
हेही वाचा - 'वीज दरवाढीचा परिणाम सामान्य नागरिकांवर पडणार नाही'