नागपूर Gold Smuggling News : सोने तस्करीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार आज समोर आलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ (Nagpur Airport) नागपूर येथे एका प्रवाश्याकडून दोन किलो वजनाची सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनाकडून कारवाई करण्यात आली आहे. एअर अरेबिया, शारजाह फ्लाईटमध्ये प्रवास करत असलेला एक प्रवासी सोन्याची पेस्ट घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती, महसूल गुप्तचर संचालनाकडून (DRI) अधिकाऱ्यांना समजली होती.
बेल्टमध्ये लपवून सोन्याची पेस्ट आणली : गोपनीय माहितीच्याआधारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्या व्यक्तीने बेल्टमध्ये लपवून सोन्याची पेस्ट आणली होती. पेस्टची अंदाजे किंमत १ कोटीच्या घरात आहे, रुंद बेल्टमध्ये शिलाई करून सोन्याची पेस्ट लपवून ठेवली होती. हा 30 वर्षीय युवक असून नागपुरचा रहवासी आहे. यापूर्वी त्यानं अश्या पद्धतीनं सोन्याची तस्करी केली तर नाहीना याचा शोध सुरू आहे.
प्रायव्हेट पार्टमध्ये लपवली २ किलो सोन्याची पेस्ट : याआधीही अशीच एक घटना घडली होती. दोन तरुणांनी दुबई येथून स्वतःच्या प्रायव्हेट पार्टमध्ये २ किलो सोन्याची पेस्ट लपवून आणल्याचं नागपूर विमानतळावर तपासणी दरम्यान उघडकीस आले होते. शाहीद नालबंद आणि पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर असे आरोपींचे नावं होते. ते दोघेही कर्नाटक राज्यातील रहिवासी होते. दोघांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून दोन किलोहून अधिक सोन्याची पेस्ट आणली होती. दोनही आरोपींची सोन्याची पेस्ट कॅप्सूलमध्ये भरली होती. ते सोनं कॅप्सूल प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवले होते.
हेही वाचा -
- Eight Crores Gold Seized : अबब...! मुंबईहून तस्करी होणारे आठ कोटी रुपयांचं सोनं जप्त, दोन तस्करांची चौकशी सुरू
- Gold Smuggling: सोन्याच्या तस्करीच्या आरोपावरून मुंबई विमानतळ कस्टम्सने केली भारतीय नागरिकाला अटक; २.२८ कोटी रुपयांचे केले सोने जप्त
- Stolen Gold Seized : ऑर्किड हॉटेलमध्ये लग्न समारंभात चोरट्यांनी लुटलेले सोने जप्त करण्यात पोलिसांना यश