ETV Bharat / state

Zika Virus Mumbai : मुंबईत झिका व्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळला, महानगरपालिका अलर्ट मोडवर - zika virus vaccine

Zika Virus Mumbai : मुंबईत झिका व्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळलाय. २३ ऑगस्टला रोजी चेंबूर येथे झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता.

Zika
झिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 1:05 PM IST

मुंबई Zika Virus Mumbai : मुंबईत झिका व्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळल्यानं आता बृहन्मुंबई महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. शहरात १५ वर्षीय रुग्ण झिका व्हायरसबाधित आढळल्याची माहिती पालिकेनं दिली. मुंबईत २३ ऑगस्ट रोजी झिका व्हायरसच्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली होती. तर दुसरा रुग्ण पूर्व मुंबईच्या कुर्ला उपनगरात आढळला होता.

रोगाची लक्षणं काय आहेत : झिका व्हायरसचा विषाणू प्रामुख्याने एडिस डासांमुळे पसरतो. गर्भधारणेदरम्यान या विषाणूचा संसर्ग झाल्यास बाळामध्ये काही जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात (zika virus vaccine pregnancy). या रोगावर कोणतीही लस किंवा औषध नाही. ताप, पुरळ, डोकेदुखी, सांधेदुखी, डोळे लाल होणे, स्नायू दुखणे ही या रोगाची लक्षणं आहेत (zika virus symptoms). चेंबूर येथे झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. येथे एका ७९ वर्षीय व्यक्तीला व्हायरल संसर्ग झाल्याचं पालिकेनं २३ ऑगस्ट रोजी जाहीर केलं होतं. चांगली बातमी म्हणजे, हा रुग्ण यातून पूर्णपणे बरा झाला आहे.

महापालिकेचं नागरिकांना आवाहन : झिका व्हायरस हा संसर्गजन्य आजार असला तरी लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन पालिकेनं केलंय. 'झिका विषाणूची लागण झालेले लोक स्वत:च बरे होतात. ८० टक्के लोकांमध्ये याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या रुग्णाची माहिती मिळताच आम्ही तत्काळ रुग्णाच्या घराच्या परिसरातील इतर घरांमध्ये सर्वेक्षण केलं. परंतु आम्हाला इतर कोणतंही प्रकरण आढळलं नाही', असं बीएमसीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

गरोदर मातांना विषाणूचा सर्वाधिक धोका : झिका विषाणू संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. या डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया हे रोग देखील होतात. झिका विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्णानं योग्य ती काळजी घेणं आवश्यक असतं (zika virus treatment). अन्यथा रुग्णांना दवाखान्यात दाखल करावं लागतं. गरोदर मातांना या विषाणूचा सर्वाधिक धोका असतो. मातांनी योग्य काळजी न घेतल्यास बाळाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. गेल्या मे महिन्यात ब्रिटनच्या एका विद्यापीठानं झिका विषाणूची लस बनवली होती. त्याच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत (zika virus vaccine). यापूर्वी प्राण्यांवर याचा प्रयोग करण्यात आला होता. अजून ही लस मानवी उपयोगासाठी उपलब्ध झालेली नाही.

हेही वाचा : Diseases caused by mosquitoes : डासांमुळे होणारे कोणतेही आजार टाळण्यासाठी 'अशी' घ्या खबरदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.