मुंबई - बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा आहे. देशातील सद्यपरिस्थितीमुळे नागरिकांच्या नोकऱ्या जाऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. मात्र, देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी येऊ नये, अशी प्रार्थना देवाकडे करीत असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.
हे वाचलं का? - भाजप सरकारच्या धोरणाने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला - बाळासाहेब थोरात
शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन व शिवम रुग्णालयाच्यावतीने डायलिसिस केंद्र उभारण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते डायलिसीस केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
हे वाचलं का? - ऑटोमोबाईल उद्योगातील मंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर!
शिवसेना शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी लढली. शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी राहिली. अशा अनेक प्रश्नांतून शिवसनेने जनतेचे प्रश्न सोडवले. त्यामुळे कोणत्याही मतदार संघात गेल्यावर आपल्या कामाची यादी देऊ शकणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असल्याचे आदित्य म्हणाले.