ETV Bharat / state

पवईत तरुणाची आत्महत्या; सहकारी कार्यालयात समलिंगी म्हणून छळ करायचे - छळ

अनिकेत पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे. पवई पोलिसांनी या सुसाईड नोटची सत्यता पडताळून अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या सुसाईड नोटमध्ये अनिकेतने त्याच्या सहा सहकाऱ्यांचे नावे घेतली असून त्यांची चौकशी पोलीस करत आहेत.

अनिकेत पाटील
author img

By

Published : Jul 26, 2019, 6:42 PM IST

मुंबई - कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत असताना सहकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून अनिकेत पाटील या 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पवईत समोर आली आहे.

पवईत तरुणाची आत्महत्या; सहकारी कार्यालयात समलिंगी म्हणून छळ करायचे

मूळचा जळगावचा असलेल्या अनिकेतने आपले एमबीएचचे शिक्षण पूर्ण करून कॉलेजमधील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जे के हेलन कर्टिस या खासगी कंपनीत नोकरीला लागला. अनिकेत शांत स्वभावाचा आणि नेहमी कामात गुंतलेला असायचा. त्याची कुणीही मैत्रीण नव्हती, त्यामुळेच त्याला त्याच्या कंपनीमध्ये असलेल्या सहकाऱ्यांकडून तो समलिंगी असल्याचे मानले जात होते.

दिवसेंदिवस हा त्रास वाढतच गेला. त्यामुळे अनिकेतने याची तक्रार त्याच्या वरिष्ठांकडेदेखील केली. कंपनीच्या एचआरला देखील त्याने लेखी तक्रार दिली होती. परंतु, यातून काहीच साध्य झाले नाही. उलट अनिकेतला अधिकच त्याच्या सहकाऱ्यांकडून त्रास होऊ लागला. या संदर्भात त्याने त्याच्या आई-वडिलांनादेखील याची कल्पना दिली होती. आई-वडिलांनी त्याला नोकरी सोडण्याचा सल्लाही दिला.

25 जूनला अनिकेत एका वरिष्ठाच्या रिटायरमेंट पार्टीवरून आपल्या घरी साकी विहार रोड श्रुती कॉम्प्लेक्स येथे आला. एक अभियंता आणि एमबीएच्या प्राध्यापकाशी आणि आपल्या आईशी बोलून तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने पुन्हा त्याच्या मोबाईलवर कॉल केला असता, अनिकेतकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. म्हणून त्याच्या आईने त्याच्या मित्रांना याची माहिती दिली. मित्रांनी अनिकेतच्या रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अनिकेत बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला पवई पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

आत्महत्येपूर्वी अनिकेतने तीन पानांची सुसाईड नोट लिहिली होती. कंपनीत होत असलेला सर्व प्रकार नमूद केला होता. ही सुसाईड नोट त्याने त्याच्या सुटकेसमध्ये सुरक्षित ठेवली होती. त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्याच्या वडिलांनी ही सुटकेस उघडून पाहिली असता त्यांना ही तीन पानांची सुसाईड नोट मिळाली. यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली. पवई पोलिसांनी या सुसाईड नोटची सत्यता पडताळून अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे..या सुसाईड नोटमध्ये अनिकेतने त्याच्या सहा सहकाऱ्यांचे नावे घेतली असून त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

Intro:

पवईत तरुणांची आत्महत्या सहकारी कार्यालयात समलिंगी म्हणून छळ करायचे .

कार्पोरेट कंपनीमध्ये काम करत असताना सहकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून अनिकेत पाटील या 25 वर्षीय तरुणाने आपलं आयुष्य संपवल्याची घटना पवईत समोर आली आहे.Body:

पवईत तरुणांची आत्महत्या सहकारी कार्यालयात समलिंगी म्हणून छळ करायचे .

कार्पोरेट कंपनीमध्ये काम करत असताना सहकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून अनिकेत पाटील या 25 वर्षीय तरुणाने आपलं आयुष्य संपवल्याची घटना पवईत समोर आली आहे.

मूळचा जळगावचा असलेला अनिकेतने आपलं एम बी एच शिक्षण पूर्ण करून कॉलेजमधील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जे के हेलन कर्टिस या खाजगी कंपनीत नोकरीस लागला . अनिकेत शांत स्वभावाचा आणि नेहमी कामात गुंतलेला असायचा . त्याची कुणीही मैत्रीण नव्हती त्यामुळेच त्याला त्याच्या कंपनीमध्ये असलेल्या सहकाऱ्यांकडून तो समलिंगी असल्याचं मानलं जात होतं .

दिवसेंदिवस हा त्रास वाढतच गेला. त्यामुळे अनिकेतने याची तक्रार त्याच्या वरिष्ठांकडे देखील केली. कंपनीच्या एच आर ला देखील त्याने लेखी तक्रार दिली. परंतु यातून काहीच साध्य झालं नाही. उलट अनिकेतला अधिकच त्याच्या सहकाऱ्यांकडून त्रास होऊ लागला. या संदर्भात त्याने त्याच्या आई-वडिलांना देखील याची कल्पना दिली होती . आई-वडिलांनी त्याला नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. 25 जूनला अनिकेत एका वरिष्ठाच्या रिटायरमेंट पार्टी वरून आपल्या घरी साकी विहार रोड श्रुती कॉम्प्लेक्स येथे आला. एक अभियंता आणि एमबीएच्या प्राध्यापकाशी आणि आपल्या आईशी बोलून तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने पुन्हा त्याच्या मोबाईलवर कॉल केला असता. अनिकेत कडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. म्हणून त्याच्या आईने त्याच्या मित्रांना याची माहिती दिली. मित्रांनी अनिकेतच्या रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अनिकेत बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.त्याला पवई पोलिसानी राजावाडी रुग्णालयात दाखल केले तेथे त्यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

आत्महत्येपूर्वी अनिकेतने तीन पानांची सुसाईड नोट लिहिली होती. कंपनीत होत असलेला सर्व प्रकार नमूद केला होता. ही सुसाईड नोट त्याने त्याच्या सुटकेसमध्ये सुरक्षित ठेवली होती. आणि त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्याच्या वडिलांनी ही सुटकेस उघडून पाहिली असता त्यांना ही तीन पानांची सुसाईड नोट मिळाली आणि यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली . पवई पोलिसांनी या सुसाईड नोट ची सत्यता पडताळून अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून.या सुसाईड नोटमध्ये अनिकेत ने त्याच्या सहा सहकाऱ्यांचे नावे घेतली असून त्याची चौकशी पोलीस करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.