ETV Bharat / state

सिगारेट आणण्यास नकार दिल्याने युवकाचा खून, घाटकोपरमधील घटना - मुंबई हत्या बातमी

सिगारेट आणण्यास नकार दिल्याने मित्रांनीच लाथा-बुक्क्याने मारहाण केली. यात त्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये घडली आहे.

yogesh
मृत योगेश
author img

By

Published : Aug 27, 2020, 5:18 PM IST

मुंबई - घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये सिगारेट न आणल्याच्या कारणावरुन एकाची हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकारणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे. योगेश गरूड (वय 24 वर्षे, रा. आम्रपाली चाळ, कामराज नगर), असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार, कामराज नगर येथे योगेश गरुड हा आपल्या 3 मित्रांसह बसला होता. त्याच्या मित्राने त्याला सिगारेट विकत आणण्यास सांगितले होते. यावेळी सिगारेट आणण्यास योगेशने नकार दिला. यावरुन आरोपी आकाश सरदार (वय 20 वर्षे) आणि अविनाश भोपळे (वय 24 वर्षे) तसेच आणखी एक आरोपी यांनी योगेशला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत योगेश याच्या छातीत जास्त मार लागल्याने तो खाली कोसळला. त्यावेळी आरोपी तत्काळ घटनास्थळावरुन पळून गेले योगेशच्या नातेवाईकांनी आणि इतरांनी त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याबाबात रुग्णालयाने पंतनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी केली असता आरोपी अविनाश श्रीरंग भोपळे, आकाश जगन सरदार या दोघांना अटक केली आहे. आरोपींवर भा.दं.वि.चे कलम 302, 323, 504, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी दिली.

हेही वाचा - नागपाड्यात एका इमारतीचा काही भाग कोसळला, ढिगाऱ्याखील काही जण अडकल्याची भिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.