मुंबई - ॲपद्वारे कर्ज देऊन त्याची वसुली करण्यासाठी कर्जदाराची बदनामी करण्याचा प्रकार समोर येत असताना अशाच एका प्रकरणांमध्ये मुलुंडच्या एका 22 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. योगेश माने असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या -
योगेश हा रिक्षाचालकाने असून त्याने 12 डिसेंबर रोजी रुपी अॅपमधून वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून 40 हजारांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर काही दिवसांतच कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कंपनीकडून तगादा सुरू झाला. इतकेच नाही, तर या ॲपने योगेशच्या मोबाईलमधील सर्व कॉन्टॅक्ट मिळविले होते. या कॉन्टॅक्टचा एक व्हाट्सअप ग्रुप बनविण्यात आला आणि पैसे भरले नाही, तर या ग्रुपवर तुझी बदनामी करू, असे कॉलदेखील त्याला यायला लागले. त्यामुळे बदनामीच्या भीतीने रविवारी ऐरोली खाडीत उडी घेऊन योगेशने आत्महत्या केली. यासंदर्भात योगेशच्या कुटुंबीयांनी कंपनीच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा - Cong Day: मुंबईत काँग्रेसचा महापौर बसवण्याचा संकल्प