ETV Bharat / state

Young Girl Suicide: वडिलांनी मोबाईल वापरण्यावरून हटकले... नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

author img

By

Published : Apr 11, 2023, 8:11 AM IST

आई वडिलांनी मोबाईल फोन काढून घेतल्याच्या रागात एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना मालाड येथे घडली.

Young Girl Suicide
नववीच्या विद्यार्थ्याने रागात केली आत्महत्या

मुंबई: सोशल मीडियाचा अतिरेक केल्याने मुलांच्या मनावर किती परिणाम होतो, हे दाखवून देणारी घटना समोर आली आहे. विद्यार्थिनी, आई, वडील आणि तीन बहिणींसोबत मालवणी येथे राहत होती. तिचे वडील मनी ट्रान्सफरच्या दुकानात काम करतात. घटनेपूर्वी मुलगी घरातून पळून मालाड येथील लिबर्टी गार्डन येथे पोहोचली आणि शनिवारी सायंकाळी तिने आत्महत्या केली. आत्महत्या केल्याची तक्रार दिली. ती तिचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत असल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला होता.

मोबाईल फोन आणि आत्महत्या: याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी घटनास्थळ गाठून मुलीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात नेले. दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांना चौकशीसाठी बोलावले. त्यादरम्यान ही मुलगी नैराश्यग्रस्त असल्याचे उघड झाले. मालाडमधील एका कॉन्व्हेंट शाळेत ती नववीत शिकत होती. ती तिचा जास्तीत जास्त वेळ अभ्यासाऐवजी सोशल मीडियावर घालवत असे, त्यामुळे तिचे आई-वडील तिला सतत रागावत असत. ते तिचा फोन काढून घेत होते. घटनेच्या दिवशीही असाच प्रकार घडला होता, असे अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, मृतदेहाचे शवविच्छेदन करून तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यासाठी एडीआरची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सतत मोबाईलचा वापर: लॉकडॉऊन काळात मुलांचा स्क्रीनटाईम वाढला आणि मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेट्स आणि इतर गॅझेट्सची सवय लागली. आता ही सवय कमी करत असताना पालकांना मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे आढळून येत आहे. शाळा, महाविद्यालय बंद असल्याने मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले होते. बाहेरचे खेळ बंद झाल्यानं अगदी लहान मुलंही तासनतास मोबाईलवर खेळू लागले. आता ती एक सवय झाली आहे. जर मुलांना मोबाईल मिळाला नाही किंवा त्यांच्या मनाप्रमाणे काही झाले नाही तर ते कुठलंही पाऊल उचलू शकतात, अशा घटना सातत्याने समोर येत आहेत.

हेही वाचा: Minor Girl Raped अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली माती आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.