ETV Bharat / state

Mumbai Crime News: मुंबईला अमली पदार्थांचा विळखा; 10 कोटींचा एमडी ड्रग्स केला जप्त, वांद्र्यातून तिघांना अटक

अमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटने वांद्रा परिसरात मोठी कारवाई केली आहे. 17 आणि 18 मार्चला लागोपाठ दोन दिवस कारवाई करून दहा कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. तसेच या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime News
अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटची मोठी कारवाई
author img

By

Published : Mar 21, 2023, 7:14 AM IST

अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटची मोठी कारवाई

मुंबई : 'अमली पदार्थमुक्त समाज' बनविण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई शहर पोलीस आयुक्तालय सतत प्रयत्नशील असल्याचे आपल्याला माहिती आहे. नुकतेच बीकेसी बांद्रा पूर्व परिसरामधुन मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने अमली पदार्थाची खरेदी विक्री व पुरवठा करणाऱ्या तीन आरोपींना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 5 किलो 19 ग्रॅम वजनाचा आणि 10 कोटी 3 लाख 80 हजार किंमतीचा मेफेड्रॉन नावाचा अमली पदार्थ जप्त केला आहे.

इसमांच्या संशयास्पद हालचाली : वरळी युनिटचे पथक अमली पदार्थ खरेदी-विक्री, पुरवठा, साठा करणाऱ्या इसमांचा शोध घेत होते. 17 मार्चला गस्तीदरम्यान शोध घेत असताना बीकेसी अग्निशमन केंद्राजवळ वांद्रे पुर्व या ठिकाणी तीन इसमांच्या संशयास्पद हालचाली त्यांना आढळून आल्या. युनिटने त्यांना ताब्यात घेवुन पंचासमक्ष त्यांची झडती घेतली. गुन्ह्याच्या तपासामध्ये पहिल्या दोन आरोपींना अमली पदार्थ एमडी पुरविला असल्याचे निष्पन्न झाले.

एमडी ड्रग्स जप्त : याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 मार्चला रात्री साडेअकरा वाजता आणि 18 मार्चला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास या दोन कारवाया करण्यात आल्या. या दोन्ही कारवायांमध्ये तीन इसमांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला आहे. एका आरोपीकडून 60 ग्रॅम एमडी तर दुसऱ्या आरोपीकडुन 100 ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आला आहे. तिसऱ्या आरोपीकडुन 4 किलो 859 ग्रॅम एमडी अमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटने जप्त केला आहे.

अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय : सदर गुन्हयातील अटक आरोपींकडुन अद्यापपर्यंत एकूण 5 किलो 19 ग्रॅम अमली पदार्थ एमडी जप्त करण्यात आला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे अंदाजे रुपये 10 कोटी 03 लाख 80 हजार इतकी किंमत आहे. तिसरा आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध 2021 मध्ये नागपुर आयुक्तालयात वाणिज्य स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. तो जामीनावर मुक्त झाल्यानंतर पुन्हा अमली पदार्थ विक्रीच्या व्यवसायात सक्रीय झाला आहे. मुंबईमध्ये अमली पदार्थ खरेदी विक्रीचे प्रमाण वाढत आहे.

हेही वाचा : Beed Crime News: पाहा, आष्टीतील भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश; 9 लाखांचे पावडर, रसायन जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.