मुंबई - सध्या जगभरात कोरोना सावट पसरले आहे. कोरोनाविरोधातील युद्धात एखाद्या सैनिका प्रमाणे आपली भूमिका बजावत आहेत त्या परिचारिका. त्यांना कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, त्या एखाद्या सैन्यातील सैनिकाप्रमाणे 'फ्रंट वॉरियर'बनून लढा देत आहे, अशा नर्सेसला 'ईटीव्ही भारतचा सलाम'
आज जागतिक परिचारिका दिन या निमित्त आपण, के. ई. एम.च्या अधिसेविका (मेट्रन) डॉ. प्रतिमा नाईक यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी कोरोनाविरोधातील लढ्या येणाऱ्या अडचणींविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, अनेक परिचारिका कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सुश्रृषेसाठी घरुन ये-जा करत आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणच्या अनेक नागरिक त्यांना त्यांच्या कामाबाबत विरोध करत आहेत. एवढेच नाही तर तपासणीसाठी घरोघरी जाणाऱ्या अनेक परिचारिकांना दुय्यम वागणुक दिली जाते. पण, अधिसेविका या नात्याने सर्व परिचारिकांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची समजूत काढावी लागते, डॉ. नाईक म्हणाल्या.
कोरोनात काम करणे परिचारंकांसाठी आव्हानात्मक
मुंबईमध्ये कोरोना विळखा वाढत चालला असून यामुळे अनेकवेळा मोठ्या संख्येने रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. कोरोनाग्रस्त रुग्णांचे उपचार करताना आपल्याला कोरोना होणार नाही, याबाबत सर्व काळजी घ्यावी लागते. पण, सर्वाधिक आव्हान कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रूग्णाच्या नातेवाईकांना समजविणे, त्यांना मानसिक आधार देण्याचे काम परिचारिका करतात.
रुग्णाला बर करणे हेच एकमेव ध्येय
कोरोना असो किंवा नसो रुग्णसेवा हीच इशसेवा या ब्रिदवाक्याप्रमाणेच आम्ही रुग्णांची सेवा करत असतो. त्यामुळे रुग्णाला बरे करणे हेच आमचे एकमेव ध्येय असते, असे डॉ. नाईक म्हणाल्या.
फ्लोरेन्स नाईंटिंगेल यांच्या हायजिन थेअरी आजही उपयोग
ज्यांना वाढदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी हायजिन थेअरी मांडली होती. हायजिन म्हणता स्वच्छता. रुग्ण असो की रुग्णसेवा करणारे परिचारिका यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता ठेवणे अतिशय गरजेचे आहे, असे या थेअरीत म्हटले आहे. आज कोरोना विरोधातील युद्धात स्वच्छते किती महत्व आहे. हे सर्वांना माहिती आहेच. यामुळे त्यांच्या थेअरीचा आजही उपयोग होतो, असे डॉ. नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा - oronavirus : धारावीतील रुग्णांना आजपासून 'अर्सेनिक अल्बम 30' गोळ्यांचा डोस